Bharti Singh Announces Second Pregnancy: कॉमेडीयन भारती सिंहच्या (Bharti Singh) घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार असून ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. भारती सिंहनं पती हर्ष लिंबाचियासोबतचा फोटो शेअर करत बेबी बंप फ्लॉन्ट केला आणि गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. 

Continues below advertisement

भारती सिंहनं पती हर्ष लिंबाचियासोबतचा (Haarsh Limbachiyaa) एक फोटो शेअर करुन आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. भारती सिंहनं तिचा पती हर्ष लिंबाचियासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिनं तिचा बेबी बंप दाखवलाय आणि दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं. या बातमीनं भारती सिंहच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं.  

फोटो शेअर करत भारतीनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "आम्ही पुन्हा पॅरेंट्स बनणार आहोत... आशीर्वाद, गणपती बप्पा मोरया।" भारतीच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Continues below advertisement

भारतीच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव (Bharti Singh Share Social Media Post)

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे सेलिब्रिटी मित्र आणि चाहते त्यांना अभिनंदन करत आहेत. टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूझानं लिहिलंय की, 'अभिनंदन...' अदा खाननंही रेड हार्ट इमोजीसह या जोडप्याचं अभिनंदन केलंय. ईशा गुप्ता, दर्शन कुमार, कृष्णा मुखर्जी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करून भारती आणि हर्ष यांचं अभिनंदन केलंय. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय की, "तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन...' तर दुसऱ्यानं लिहिलंय की, 'तुम्हा दोघांचंही अभिनंदन...'

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dhanashree Verma On Yuzvendra Chahal Divorced: 'त्याला डेटिंगशिवाय माझ्याशी लग्न करायचं होतं...', युझीसोबतच्या लग्नाबद्दल धनश्रीचा पुन्हा धक्कादायक खुलासा