Bappi Lahiri Worked In 33 Movies And 180 Songs In Single Year: एका वर्षात 180 गाणी रेकॉर्ड करणारा सुपरस्टार 'गोल्डन सिंगर', गिनीज बुकमध्येही नोंद, सोन्याच्या कपात प्यायचा चहा
Bappi Lahiri Worked In 33 Movies And 180 Songs In Single Year: बप्पी लाहिरी यांनी 1973 मध्ये 'नन्हा शिकारी' या गाण्यानं संगीत दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, पण त्यांची खरी ओळख 1975 च्या 'जखमी' या गाण्यानं झाली, ज्यामध्ये त्यांनी म्युझिक दिलेलं आणि पार्श्वगायक म्हणूनही पदार्पण केलं.

Bappi Lahiri Worked In 33 Movies And 180 Songs In Single Year: भारतीय सिनेसृष्टीत जेव्हा जेव्हा 'डिस्को' हा शब्द वापरला जातो, तेव्हा लगेचच एक चेहरा डोळ्यांसमोर येतो जड सोन्याच्या साखळ्या, लांब केस, चष्मा आणि चेहऱ्यावरचं गोड स्माईल असलेला भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रिय गायकांपैकी एक बप्पी लाहिरी (Bappi Lahiri). भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात गायक बप्पी लाहिरी यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला आहे.
बप्पी लाहिरी यांनी 1973 मध्ये 'नन्हा शिकारी' या गाण्यानं संगीत दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, पण त्यांची खरी ओळख 1975 च्या 'जखमी' या गाण्यानं झाली, ज्यामध्ये त्यांनी म्युझिक दिलेलं आणि पार्श्वगायक म्हणूनही पदार्पण केलं. हळूहळू, बप्पी लाहिरींची लोकप्रियता वाढली आणि त्यांचे सूर प्रत्येक पार्टीचं आकर्षण बनलं. त्यांच्या सुरांनी केवळ जुन्या पिढीलाच नव्हे, तर प्रत्येक पिढीला डान्स करायला भाग पाडलं, त्यांच्या पॉप-डिस्को फ्युजन आणि वेगवान बीट्सनं त्यांना इंडस्ट्रीत 'डिस्को किंग' म्हणून ओळख मिळवून दिलेली.
एका वर्षात 180 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली
बप्पी लाहिरी म्हणत असत की, वर्षाला दोन किंवा तीन चित्रपटांमध्ये काम करणं पुरेसं आहे, पण त्यांनी एका वर्षात 33 चित्रपट आणि 180 गाणी रेकॉर्ड करून इतिहास रचला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवून दिलं. बप्पी लाहिरी यांनी 1986 मध्ये ही कामगिरी करून संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का दिला.
लहानपणापासूनच गिरवले संगीताचे धडे
बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी बंगालमधील एका संगीतमय कुटुंबात झाला. त्यांचे वडील अपरेश लाहिरी आणि आई बन्सरी लाहिरी हे दोघेही बंगालमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार होते. बप्पी लाहिरी यांनी वयाच्या तिसऱ्याच वर्षी संगीताचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली, शास्त्रीय तबला वादक पंडित शांता प्रसाद यांच्याकडून संगीताचं शिक्षण घेतलं. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी पियानो आणि ट्युनिंग फोर्क्स वाजवण्यास सुरुवात केली. त्यांनी हिंदी, बंगाली आणि दक्षिण भारतीय भाषांमध्ये 5,000 हून अधिक गाणी गायली आणि 500 हून अधिक सिनेमांसाठी संगीत दिलं.
सोनं म्हणजे, जीव की प्राण
अमेरिकन पॉप स्टार एल्विस प्रेस्लीमुळे बप्पी लाहिरींना सोन्याची खूप आवड होती. बप्पी दा अमेरिकन पॉप स्टार एल्विस प्रेस्लीपासून खूप प्रभावित होते आणि ते त्यांना अनेकदा सोन्याच्या साखळ्या घालताना पाहत असत. त्यांच्या प्रभावानं प्रेरित होऊन त्यांनी ठरवलं की, जेव्हा ते यशस्वी होतील, तेव्हा तेही भरपूर सोनं घालतील आणि त्यांनी तेच केलंय. उल्लेखनीय बाब म्हणजे, बप्पी लाहिरींचं सोन्यावरील प्रेम केवळ दागिन्यांपुरतं मर्यादित नव्हतं. ते सोन्याच्या कपमध्ये चहा देखील प्यायचे. ते सोनं घालणं खूप भाग्यवान मानत होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























