Badshah Shares Cryptic Post After Divorce: बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर आणि सिंगर बादशाह (Badshah) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने सोमवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन, दुसरी बायको ईशा रिखीसोबत (Isha Rikhi) काडीमोड घेतला असल्याचं जाहीर केलं. दोघांनीही पोस्ट शेअर करुन याची माहिती दिली. 31 ऑगस्ट रोजी दोघांनीही घटस्फोट घेतला असल्याचं जाहीर केलं. मार्च 2026 रोजी दोघांचं लग्न (Divorce) झालं होतं. अवघ्या 5 महिन्यांतच दोघांचा संसार मोडला. आता ईशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर बादशाहने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही क्रिप्टिक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. बादशाहने आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं? पाहूयात.
घटस्फोटानंतर बादशाहची क्रिप्टिक पोस्ट सोशल मीडियात चर्चेत (Badshah Shares Cryptic Post Hours After Divorce From Model Isha Rikhi)
बादशाहने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या क्रिप्टिक पोस्टमध्ये म्हटलं की, 'शौकिया लोक लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण प्रोफेशनल बारकाव्यांकडे बारकाईने लक्ष देतात', असं बादशाह आपल्या पोस्टमध्ये म्हटला. बादशाहने आपल्या पोस्टद्वारे कोणतीही माहिती किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्याने आपल्या पोस्टचा रोख नेमका कुणावर होता? हे देखील सांगितलेलं नाही. दरम्यान, दुसरी बायको ईशा रिखीसोबत काडीमोड घेतल्यानंतर काही तासांतच बादशाहने ही पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, चाहते आणि नेटकरी या पोस्टचा संबंध त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडत आहेत.
बादशाहने 31 ऑगस्ट म्हणजे सोमवारी आपल्या काडीमोडबाबत पोस्ट शेअर केली होती. ईशा रिखीपासून विभक्त होत असल्याचं त्याने पोस्टमधून सांगितलं. बादशाहने म्हटलं की, 'मी आण ईशाने परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आम्ही परस्पर आदराने घेतला. आम्ही सर्वांना विनंती करतो की, आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. आमच्या नात्याबाबत कोणतेही तर्क वितर्क लावण्यात येऊ नये', असं बादशाहने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. अवघ्या 5 महिन्यांच्या संसारानंतर दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.
बादशाह आणि ईशा रिखी या दोघांनी मार्च 2026 साली प्रायव्हेट सेरेमनीमध्ये लग्न केलं होतं. यानंतर जून महिन्यात ईशाने 'Ask me Anything'च्या सेशनमध्ये बादशाहसोबत लग्न झालं असल्याचं कन्फर्म केलं. दरम्यान, जुलै महिन्यात दोघांमधील वाद विवादाच्या बातम्या कानावर पडत होत्या. या दरम्यान, ईशाने बादशाहसोबतच्या फोटो आणि व्हिडीओंचा कोलॅज करुन शेअर केला. मिळालेल्या माहितीनुसार, ईशा रिखी ही पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने 2013 साली पंजाबी सिनेमातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
