Badshah Isha Rikhi: प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह (Badshah) याने अवघ्या 5 महिन्यांच्या संसाराला पूर्णविराम दिला आहे. दोघांनीही एकमेकांना काडीमोड देण्याचा निर्णय घेतला. याच वर्षी दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण हे लग्न एक वर्षही टिकू शकलेलं नाही. आपआपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) पोस्ट शेअर करुन दोघांनी घटस्फोट घेणार असल्याचं घोषित केलं. घटस्फोटानंतर बादशाहची पत्नी ईशा रिखी (Isha Rikhi) हिची एक जुनी पोस्ट सोशल मीडियात (Social Media) व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने फेक पर्सनॅलिटीवर भाष्य केलं आहे. सध्या ईशा रिखीची जुनी पोस्ट सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
बादशाह आणि रिखीच्या घटस्फोटानंतर तिची जुनी पोस्ट व्हायरल (Badshah Isha Rikhi Divorce Five Month Marriage)
बादशाह आणि ईशा सध्या दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विभक्त होणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, आपल्या पोस्टमधून त्यांनी घटस्फोट घेण्यामागचं कारण स्पष्ट केलेलं नाही. सध्या त्यांच्या घटस्फोटाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर ईशा रिखीची एक जुनी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने चाहते तसेच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ईशाने आपल्या जुन्या पोस्टमध्ये असं काही लिहिलेलं होतं, ज्यामुळे ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सोशल मीडियावर ईशाच्या जुन्या पोस्टचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. यात ईशाने म्हटलं होतं की, 'एखाद्या महिलेने चुकीच्या पुरुषाची निवड केली म्हणून तिला दोष देणे मूर्खपणाचे आहे. दुसरीकडे, त्या पुरुषाला मात्र यासाठी कधीच दोष दिला जात नाही, जरी त्याने तिला जिंकण्यासाठी पर्सनॅलिटीचा दिखावा केलेला असतो'. सध्या तिची जुनी पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, सोमवारी ईशा आणि बादशाहने आपल्या इन्स्टाग्रा स्टोरीवर नोट शेअर केली होती. त्या नोटमध्ये दोघांनी म्हटलं होतं की, 'आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी आम्ही विनंती करतो. आमच्या घटस्फोटाबाबत हेच आमचे एकमेव निवेदन असेल. कृपया आमच्या नात्याबद्दल कोणत्याही प्रकारचा तर्क - वितर्क किंवा अंदाज लावणे टाळावे', असं त्यात म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय बादशाहने आतापर्यंत दोन लग्न केली आहेत. पहिलं लग्न त्याने लंडन स्थित जॅस्मिन मसीहसोबत केलं. 2012 साली त्याचं पहिलं लग्न झालं होतं. 2017 साली दोघांनीही आपल्या मुलीचे स्वागत केले. 2020 साली दोघांनीही काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. बादशाहने दुसरं लग्न मार्च 2026 मध्ये केलं. त्याने 32 वर्षीय ईशा रिखीसोबत केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
