Ayesha Khan fake WhatsApp chat screenshots viral in screenshots: रणवीर सिंह अभिनीत धुरंधर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील कलाकारांना त्यांच्या भूमिकेमुळे विशेष पंसती मिळाली. विशेषत: अक्षय खन्ना, अर्जून रामपाल, संजय दत्त यांच्या अभिनयाचेही विशेष कौतुक करण्यात आले. अभिनेत्री आयशा खान हिनं आपली मोहक अदा शरारत या गाण्यातून सादर केली. तिचं शरारत हे गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यातील तिच्या नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आयशा खान वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रकाशझोतात असते. अलिकडेच अभिनेत्री वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.  सध्या तिचा व्हॉट्सअॅप चॅट लीक झाला आहे. 

Continues below advertisement

आयशा खाननं अलिकडेच एक खळबळजनक दावा केला आहे. कुणीतरी तिच्या नावाचा गैरवापर करुन व्हॉट्सअॅप चॅट करत असल्याचा दावा अभिनेत्रीनं केला आहे. आपल्या नावाचा गैरवापर करुन कुणीतरी बनावट व्हॉट्सअॅप चॅट करत असल्याचा दावा तिनं पोस्टद्वारे केला. तिनं या संदर्भात सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं आपल्या पोस्टमधून फेक नंबर देखील शेअर केला आहे.  

याची माहिती मिळताच आयशाला मोठा धक्का बसला.  तिनं तातडीने या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला.  मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री आयशा खानच्या नावाचा वापर करुन एकानं बनावट नंबरचा वापर करुन व्हॉट्सअॅप चॅट्स केले आहेत.  त्यानं काहींना आपल्या फसवणुकीच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच आयशा खान शॉक झाली. तिनं या संदर्भात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. 

Continues below advertisement

आयशाने बनावट नंबरचा वापर केलेले व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्रीनं म्हटलं की,  'माझा या अकाउंटशी काहीही संबंध नाही. हे अकाउंट/ नंबर माझ्या नावाचा वापर करुन जे कुणी वापरत आहे. त्यांच्याशी कृपया कुणीही  बोलू नका.  बोलण्याची गरज नाही', असं अभिनेत्रीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

 

आयशा खान सोशल मीडियात सक्रीय असते. तिचे पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतात. सध्या आयशाबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. ती लवकरच अक्षय कुमारसोबत 'भागम भाग 2' मध्ये दिसणार आहे.