Avihitham Malayalam Dark Comedy Movie On OTT: सध्या बॉलिवूड (Bollywood News) सिनेमांपेक्षा देशभरात साऊथ सिनेमांची (South Movies) मोठी क्रेझ पाहायला मिळतेय. त्यातल्या त्यात मल्याळम सिनेमे (Malayalam Movies) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालत आहेत. थ्रिलर, ड्रामा, रोमांस, अ‍ॅक्शन किंवा कॉमेडी, अशा सर्वच जॉनरच्या मल्याळम सिनेमांनी धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक जॉनरच्या मॉलिवूडमधील (Mollywood) दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना वेगळा अनुभव दिला आहे. अशातच सध्या एक मल्याळी सिनेमा (Malayalam Cinema) चर्चेचा विषय ठरतोय. मल्याळम डार्क कॉमेडी (Malayalam Dark Comedy) असलेला सिनेमा 'Avihitham' तुम्ही ओटीटीवर पाहू शकता. विशेष म्हणजे, हा सिनेमा हिंदीसह अनेक भाषांमध्ये हा सिनेमा पाहता येणार आहे. 

Continues below advertisement

थिएटरनंतर OTT वर रिलीज (Avihitham On OTT)

'Avihitham' हा सिनेमा 10 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला. थिएटर रिलीजच्या अवघ्या महिनाभरातच हा सिनेमा OTT वर रिलीज झाला आहे. IMDb वर या सिनेमाला 7.6 रेटिंग मिळालं असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. या डार्क कॉमेडी-ड्रामा सिनेमाचं दिग्दर्शन सेना हेगडे यांनी केलं आहे, तर अंबरीश कलथेरा यांनी पटकथा लिहिली आहे. सिनेमात उन्नी राज, रेन्जी कंकोल, विनीत चकयार, धनेश कोलियत, राकेश उशर आणि वृंदा मेनन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

'Avihitham'ची कथा काय? (Story Of Avihitham Movie)

सिनेमाची कथा कंजनगड नावाच्या छोट्याशा गावाभोवती फिरते. एका रात्री एक व्यक्ती नेहमीप्रमाणे मित्रांसोबत दारू पिऊन शेतातून घरी परतत असतो. त्यावेळी त्याला शेतात एक मुलगा आणि मुलगी एकमेकांना किस करताना दिसतात. प्रकाशन नीट पाहतो, तेव्हा त्याला कळतं की, तो मुलगा म्हणजे, त्याचा शेजारी विनोद, जो आधीपासूनच विवाहित आहे. तो गावातील सुतार माधवनच्या शेतात एका मुलीसोबत जवळीक साधताना दिसतोय. प्रकाशन ही गोष्ट गावातील शिंपी वेणुला सांगतो आणि काही वेळातच ही चर्चा संपूर्ण गावात पसरते.

Continues below advertisement

शेतात विनोदसोबत जवळीक साधणारी ती व्यक्ती कोण? 

पुढच्या रात्री प्रकाशन आणि त्याचे काही मित्र पुन्हा त्या ठिकाणी जाऊन हा प्रकार पाहतात. मात्र, सर्वात मोठा प्रश्न असा असतो की, विनोदसोबत दिसणारी ती मुलगी कोण आहे? गावात चर्चा वाऱ्यासारखी पसरते आणि ज्याचं शेत असतं त्याची सून निर्माला हिच्यावर कोणताही पुरावा नसताना संशय घेतला जातो. त्यानंतर गावातील काही पुरुष त्या दोघांना रंगेहाथ पकडण्याचं ठरवतात. या संपूर्ण घटनाक्रमातून गावातील मानसिकता, अफवा आणि पूर्वग्रह यांचे वास्तव चित्रण सिनेमात दाखवलं आहे.

'Avihitham'चा अर्थ काय?

Avihitham या शब्दाचा अर्थ व्यभिचार किंवा विवाहबाह्य संबंध असा होतो. अकीरा कुरोसावाचा 'राशोमोन' पासून वोंग कार-वाईच्या 'इन द मूड फॉर लव' (2000) आणि एड्रियन लिनच्या 'अनफेथफुल' (2002) पर्यंत, अशा अनेक सिनेमांतून दिग्दर्शकांनी नात्यांभोवती फिरणारे तणाव, गुपितं आणि नैतिक प्रश्न हे अनेक सिनेमांमध्ये दाखवलं गेलं आहे. या सिनेमातही दिग्दर्शक सेना हेगडे यांनी त्याच विषयाला डार्क कॉमेडीच्या माध्यमातून हाताळलं आहे.

सामाजिक रूढींवर भाष्य करणारा डार्क कॉमेडी सिनेमा 'Avihitham'

Avihitham सिनेमा ग्रामीण समाजातील रूढी, अफवा आणि पूर्वग्रह यांवर भाष्य करतो. बॉक्स ऑफिसवर सिनेमानं फार मोठी कमाई केली नसली तरी त्याच्या कथानक आणि सादरीकरणाचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं आहे. त्यामुळे अनेक समीक्षकांनी याला विचित्र पण मनोरंजक ग्रामीण डार्क कॉमेडी, असं म्हटलं आहे.

OTT वर कुठे पाहाल सिनेमा?

मल्याळम सिनेमा Avihitham OTT प्लॅटफॉर्म JioHotstar वर उपलब्ध आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्येही पाहता येणार आहे. 

ट्रेलर पाहिलात? 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

‘धुरंधर’पेक्षाही तगडा स्पाय थ्रिलर! 1500 कोटी कमवत घातलेला धुमाकूळ, OTT वरचा 'हा' चित्रपट चुकूनही चुकवू नका