Atul Parchure Scenes Viral Awarapan: बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीचा बहुचर्चित 'आवारापन 2' (Awarapan 2) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. जवळपास दोन दशकांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला इमरान हाश्मी शिवम पंडित च्या भूमिकेत दिसलाय. त्याचा आक्रमक आणि सूड आणि पेटलेला अंदाज पाहून प्रेक्षक थक्क होतायत. पहिल्या 'आवारापन' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसली तरी प्रेक्षकांची दाद मिळवली होती. 'आवारापन 2' ने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं असलं तरी सध्या पहिल्या भागातील अभिनेते अतुल परचुरे यांचा एक सीन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसतोय.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेते अतुल परचुरे यांचं 14 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झालं. त्यांची उणीव आजही प्रेक्षकांना जाणवते. त्यांच्या भूमिका पाहून आजही चाहत्यांच्या डोळ्यात पाणी येतं.
'आवारापन'मधील अतुल परचुरेंचा सीन होतोय व्हायरल
2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या इमरान हाश्मीच्या 'आवारापन' चित्रपटात अभिनेते अतुल परचुरे यांनी सिद्धार्थ सूद या बौद्ध भिक्षूची भूमिका साकारली होती.इमरान हाश्मीच्या शिवम सोबतची त्यांची दृश्ये चित्रपटातील लक्षात राहणाऱ्या प्रसंगांपैकी होती. सध्या ' 'आवारापन 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असला तरी, सोशल मीडियावर पहिल्या भागातील अतुल परचुरेंचे सीन व्हायरल झाले आहेत. अनेक वर्षांनंतर आज पुन्हा एकदा चाहत्यांना अतुल परचुरेंची प्रकर्षानं आठवण झाली आहे.
'आवारापन'च्या चाहत्यांना या सिनेमातली एक व्यक्तिरेखा कधीच विसरता येणार नाही. या चित्रपटाचा दुसरा भाग आल्यानंतरही अभिनेते अतुल परचुरे यांची पुणे व सगळ्यांनाच जाणवली. या चित्रपटातील त्यांचे काही जुने सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रपटात इम्रान हाश्मी आणि अतुल पुरचुरे यांचे केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. अतुल परचुरेंचा निरागस स्वभाव आणि दमदार अभिनय प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे.
