Atul Kulkarni Post On NEET Exam Controversy: नीट पेपरफुटी प्रकरणाने (NEET Paper Leak Case) देशभरात खळबळ उडालेली आहे. केंद्र सरकारने 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द (NEET Exam Cancel) करण्याचा निर्णय घेतल्याने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये रोष दिसून येतोय. देशात 42 तास अगोदर या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत जयपुरमधून 3, गुरुग्राममधून एक, नाशिक आणि अहिल्यानगर मधून एक अशा एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर सर्व स्तरांमधून टीका होत असताना मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेत्याने केलेली उपहासात्मक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अभिनेता अतुल कुलकर्णीने x माध्यमावर नीट परीक्षेचा पेपरफुटी संदर्भात केलेल्या या पोस्टची मनोरंजनसृष्टीत चर्चा आहे. (Atul Kulkarni)

Continues below advertisement

नीट पेपरफुटी प्रकरणावर अतुल कुलकर्णीची पोस्ट

नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाने देशभरातील विद्यार्थी पालक व विविध क्षेत्रातील दिग्गजांनी यावर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान कला विश्वातून अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी एक उपहासात्मक पोस्ट शेअर केल्याने त्याची एकच चर्चा आहे. अतुल यांनी ' फुटलेल्या पेपर मधील न सोडवलेले प्रश्न ' असं म्हणत सरकारला टोला लगावलाय. गाळलेल्या जागा भरा म्हणत त्याने काही म्हणी प्रश्नांच्या स्वरूपात लिहिले आहेत.

 

अतुल कुलकर्णी हे मराठी आणि हिंदी विश्वातील दिग्गज अभिनेते आहेत. केवळ मराठीतच नाही तर हिंदी व इतर भाषांमध्ये त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक होताना दिसतं. 'नटरंग' ' रंग दे बसंती ' 'सिटी ऑफ ड्रीम्स ' बंदिश बँडिट' यासारख्या चित्रपट व वेब सिरीजमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं.सोशल मीडियावरही ते सक्रिय असतात.वेगवेगळ्या विषयांवरील त्यांची मतं परखडपणे मांडताना ते दिसतात. पेपरफुटीसारख्या घटनेमुळे नीट परीक्षा रद्द करावी लागल्यामुळे सरकारच्या उदासीन शिक्षण धोरणाची चर्चा होत असताना अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी केलेली ही उपहासात्मक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.