Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) गेल्या 19 दिवसांपासून उपोषणावर आहेत. 'नीट' (NEET) परीक्षेचा पेपर फुटल्याच्या (NEET Paper Leak) प्रकरणानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Education Minister Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यासह इतर मागण्यांसाठी ते दिल्लीतील (Delhi News) जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत. त्यांच्या या उपोषणाचा सरकारवर अद्याप कोणताही परिणाम झालेला दिसत नसला, तरी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrity) त्यांच्या समर्थनासाठी उघडपणे पुढाकार घेतला आहे. काही कलाकारांनी तर त्यांना उपोषण मागे घेण्याचंही आवाहन केलंय. अशातच आता अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी सोनम वांगचुक यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक दिवसाचं प्रतिकात्मक उपोषण करण्याची घोषणा केली आहे. 

Continues below advertisement

अतुल कुलकर्णींचं एक दिवसाचं उपोषण

अतुल कुलकर्णी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की, सोनम वांगचुक यांचं उपोषण, त्यांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका यांवर भाष्य केलंय. तसेच, गुरुवार, 16 जुलै रोजी आपण स्वतःच्या घरातूनच एक दिवसाचं उपोषण करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय.

Continues below advertisement

"घरीच एक दिवसांचं उपोषण करणार, याची  2 कारणं..."

व्हिडीओमध्ये अतुल कुलकर्णी म्हणाले आहेत की, "मी 16 जुलै रोजी माझ्या घरी एक दिवसाचं उपोषण करेन. याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे, मला सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वेदनांची जाणीव करून घ्यायचीय. दुसरं कारण म्हणजे, या मुद्द्याबाबत संवेदनशीलता दाखवावी, असं आवाहन मला सरकारला करायचंय."

अतुल कुलकर्णी यांनी पुढे बोलताना सांगितलं की, "सोनम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते, त्यांच्या मागण्यांमागे गंभीर आणि चिंताजनक कारणं आहेत. दुसरीकडे, सरकारला मात्र असं वाटतंय की, त्यांचे युक्तिवाद आणि मागण्या समर्थनीय नाहीत..."

"सरकार असंवेदनशील वाटत नाही..."

अतुल यांनी हे देखील नमूद केलंय की, सरकार असंवेदनशील आहे, असं त्यांना वाटत नाही. त्यांच्या मते, अनेक प्रसंगी सरकारनं लोकांच्या भावना आणि अडचणी समजून घेतल्या आहेत. त्यांनी असं निरीक्षण नोंदवलंय की, या प्रकरणात काही गैरसमज असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दोन्ही बाजूंमधील संवादात अडथळा येतोय.

लोकांनी विचारले, "आमीर, सलमान आणि शाहरुखसारखे कलाकार आपला पाठिंबा का दर्शवत नाहीत?"

अतुल कुलकर्णींच्या पोस्टचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जातंय. "तुम्ही या मुद्द्यावर आवाज उठवत आहात आणि त्यात सक्रिय सहभाग घेत आहात, हे पाहून खरोखरंच खूप छान वाटतंय... विशेषतः अशा वेळी जेव्हा सिनेसृष्टीतील इतर अनेकजण, ज्यांच्या आवाजामुळे फरक पडू शकतो, त्यांनी अद्याप यावर उघडपणे भाष्य केलेलं नाही. ही गोष्ट केवळ तुमच्या चाहत्यांसाठीच नाही, तर सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे..." आणखी एका व्यक्तीनं म्हटलंय की, "तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद, पण आमीर, सलमान आणि शाहरुखसारखे इतर बॉलिवूड कलाकार आपला पाठिंबा का देत नाहीत?"

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Hemant Dhome On Sonam Wangchuk Protest: 'चूक बरोबर सगळं नंतर बघता येईल! पण..' हेमंत ढोमेची सोनम वांगचूक यांच्यासाठी पोस्ट; सरकारवर ताशेरे