Manoj Tiwari old notebandi clip goes viral again: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळे आपल्या वक्तव्यावरुन कायम चर्चेत असतो.  त्यानं अनेकदा विविध गोष्टींवर भाष्य केलं आहे.  तो सोशल मीडियावरही सक्रीय असतो.  त्याचे पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतात. राजकीय, सामाजिक मु्द्द्यांवर तो आपली मते मांडत असतो. तसेच अन्यायाविरोधात आवाज उठवतो.  त्यानं अलिकडेच एका नेत्यावर  आपला संताप व्यक्त केला आहे. त्यानं नेत्याचा  व्हिडिओ शेअर करुन रोष व्यक्त केला आहे. त्यानं ही पोस्ट शेअर करुन 'आणि ही आपली लायकी...' अशी प्रतिक्रिया दिली आहे.   सध्या आस्ताद काळेची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   आस्ताद काळेनं नेमकं कुणासाठी ही पोस्ट लिहिली आहे?   त्याची ही प्रतिक्रिया का व्हायरल होत आहे? पाहूयात.

Continues below advertisement

भाजप खासदार आणि प्रसिद्ध  भोजपूरी अभिनेता मनोज तिवारी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अभिनेत्याचा हा व्हिडिओ जुना असल्याचं बोललं जात आहे.  हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे, त्यांनी सर्वसामान्यांची नोटबंदीवरुन उडवलेली थट्टा.  व्हिडिओमध्ये मनोज तिवारी हे नोटबंदीच्या काळात, बँका  आणि एटीएमबाहेर रांगेत उभ्या असलेल्या सर्वसामान्यांची थट्टा करत असल्याची टीका आस्ताद काळेने केला आहे.

व्हायरल व्हिडिओत नेमकं आहे तरी काय?

 

Continues below advertisement

व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना आहे.  तो पुन्हा समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ  खासगी कार्यक्रमातील असल्याचं बोललं जात आहे.  या व्हायरल व्हिडिओत भाजप नेते मनोज तिवारी गोल टेबलवर दिसत आहे.  त्यांच्यासोबत इतरही नेते दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओत मनोज तिवारी सांगतात, की जेव्हा ते एका रांगेजवळून जात होते, तेव्हा त्यांनी उपस्थित लोकांना शांत करण्यासाठी देशभक्तीचा वापर केला होता.  'एटीएमच्या बाहेर किंवा बँकेबाहेर काही लोक उभे होते. मी म्हणालो होतो की,  तुम्ही सगळे हे देशासाठी कष्ट सोसत आहात.  तुम्हीच खरे देशभक्त आहात. हे बोलणं ऐकताच लोक हसले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या', असं मनोज तिवारींनी म्हटलं. या व्हिडिओवरुन पु्न्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

आस्ताद काळेनं पोस्टद्वारे व्यक्त केला संताप

'हे आहेत नेते अन् ही आहे आपली लायकी .. नोटबंदी नावाचा राष्ट्रीय  पीआर स्टंट सपशेल फसलाच होता.   त्यात हे लोक,  घाबरुन  रांगा लावून उभ्या असलेल्या  नागरिकांबद्दल असे भाष्य करत होते....', अशी पोस्ट आस्तादने शेअर केली. हा व्हिडिओ समोर येताच, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने भाजपवर  जोरदार हल्लाबोल केला आहे. जनतेची थट्टा केली जात असल्याची टीका, विरोधी नेत्यांनी केला.