Ashok Saraf on Sachin Pilgaonkar: मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या टाइमिंगने प्रेक्षकांची हसून पुरेवाट लावणारे दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी अनेक गाजलेले सिनेमे दिले. अनेक दिग्गजांसोबत काम केलं. पण काही जोड्या ह्या कायम प्रेक्षकांमध्ये आवर्जून चर्चेत असतात. त्यातलीच एक जोडी म्हणजे 'सचिन आणि अशोक'. अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांच्यासोबत अनेक हिट चित्रपट दिले. अलीकडेच नागपूर येथे महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ यांच्या 80व्या वर्षात पदार्पण निमित्ताने एक जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भरभरून गप्पा मारल्या.सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना सराफ म्हणाले, 'त्याला पाहिजे ते मी करतो, किंवा मी जे करतो ते त्याला समजत होतं. आमचं टाइमिंग जुळलं, आणि प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या ट्यूनिंमुळे धूमधडाका चित्रपट 50 आठवडे चालल्याचं त्यांनी म्हटलं.
अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनी 'अशी ही बनवाबनवी', 'मायबाप','आत्मविश्वास', 'गंमत जंमत', 'नवरा माझा नवसाचा ', 'आयडियाची कल्पना', 'माझा पती करोडपती',' नवरी मिळे नवऱ्याला', 'आम्ही सातपुते ', 'आमच्यासारखे आम्हीच ' असे अनेक हिट सिनेमे दिले.
'त्याला जे पाहिजे ते मी करतो.. '
सचिन पिळगावकर यांच्याबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणाले, "त्याला पाहिजे ते मी करतो. किंवा मी करतो त्याला समजत होतं. हे एकमेकाला समजत गेले. लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी 50 चित्रपट केली. याला टायमिंग जुळल होतं. म्हणून लोकांनी डोक्यावर घेतल्याचे सराफ म्हणाले. तेंव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली. आमच्याआधी पण सुपरस्टार होते. मात्र, त्याकाळात सुपरस्टार म्हणत नव्हते. महेश कोठारे क्राइम आणि अद्भुत कवठ्या महाकाल असे असायचे. सचिनकडे कौटुंबिक असायचे. धूमधडाका चित्रपट 50 आठवडे चालल्याचे सराफ म्हणाले.
चित्रपटात कथा महत्वाची असते..
कोल्हापुरात सिनेमाचं वारं वेगळं असायचं. एकावेळी दहा चित्रपटाच शूट व्हायचे. मी एकाच वेळी तीन चित्रपटाचे शूट करायचो. त्यावेळी लेखक देखील चांगले होते. घटना आणि त्याला अनुसरून डायलॉग असायला हवं तेव्हा सर्व हिट होते. चित्रपटात कितीही सजावट करा, लंडन आणि अमेरिकेत शुटिंग करा. त्यामध्ये कथा महत्वाची असते. कुठे गेले यापेक्षा काय केले हे महत्वाचे असल्याचे सराफ म्हणाले.
माझ्याआधीदेखील अनेक चांगले कॉमेडियन
अभिनय अभिनय क्षेत्रात बघणे आवश्यक, वाचनातून भाषा सुधारू शकता असेही ते म्हणाले. माझ्याआधी देखील चांगले कॉमेडियन होते. त्याचा एक जमाना होता . मराठी चित्रपटसृष्टी यांच्याविना मान्य व्हायची नाही. सहज अभिनय करणे. वाक्य कसे टाकून प्रेषक आपल्याकडे करायचं हे त्यांना माहित असायचं. मराठी चित्रपटाचा एक काळ होता तो राजा गोस्वामी वीणा बनायचं नाही असेही ते म्हणाले.
