Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी सहा दशकांहून अधिक काळ गाजवला आहे. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत केवळ मराठी नाही तर, हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजही त्यांचे चित्रपट आवर्जून पाहिले जातात. अशोक सराफ सध्या त्यांचा आगामी सिनेमा 'आदी अनंत'मुळे (Aadi Anant) चर्चेत आहे. या सिनेमात अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांची मुख्य भूमिका आहे. अलिकडेच अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओत अशोक सराफ यांचा स्वॅग पाहायला मिळत आहे.  ऑरेंज कलरची फ्लिपफ्लॉप (Ashok Saraf Viral Video) पायात घालत अशोक सराफ लॅम्बोर्गिनीमध्ये बसतात.  पायातील फ्लिपफ्लॉप काढून चारचाकीत बसतात.   दरम्यान, अशोक सराफ यांचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ AI जनरेटेड आहे.  या व्हायरल व्हिडीओवर आता  अशोक सराफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Continues below advertisement

व्हायरल लॅम्बोर्गिनी व्हिडीओवर अशोक सराफ यांची प्रतिक्रिया (Ashok Saraf on AI Generated Lamborghini viral video)

अलिकडेच अशोक सराफ यांनी सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अशोक सराफ यांनी अनेक किस्से शेअर केले. लॅम्बोर्गिनी चारचाकी व्हायरल व्हिडीओवरही अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक सराफ यांना व्हायरल व्हिडीओ दाखवण्यात आला आहे. 'अशोक मामा गाडी घेतली का तुम्ही? बघितला का हा व्हिडीओ तुम्ही? मामा एवढे पैसे आहेत का? तुमच्याकडे', असा प्रश्न मिश्कील अंदाजात विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर आणि व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना अशोक सराफ म्हणाले की, 'बघ ना, वांदे झाले ना आता... बहुतेक माझ्यावर आता धाड वगैरे येते...'.

Continues below advertisement

'या सगळ्यात एकच गोष्ट चांगली आहे. बाकी गाड्या वगैरे काही नाही, चपला उचलून मी स्वत: ठेवतो आहे' असं अशोक सराफ म्हणाले.  अशोक सराफ यांच्या व्हायरल होत असलेल्या AI जनरेटेड व्हिडीओमध्ये,  त्यांचं नवीन रुप पाहायला मिळत आहे. ग्रे कलरचा कुर्ता, धोतर आणि फ्लिपफ्लॉप घालून अशोक सराफ लॅम्बोर्गिनीच्या दिशेनं जातात.  फ्लिपफ्लॉप काढून ऐटीत चारचाकीमध्ये बसतात.  नंतर तरुण हिरोप्रमाणे कारमधून उतरतात आणि चालत जातात. हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ काहींनी खरा वाटला असेल, पण हा व्हिडीओ खरा नसून AI जनरेटेड आहे. सध्या या व्हिडीओची प्रचंड चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Abhijeet Kelkar SRA: मुंबईतील SRA विरोधात मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट; अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, बिल्डरविरोधातील लढ्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव