Ashok Saraf Lamborgini Car Video Viral: तब्बल सहा दशकांहून अधिक काळ मराठी रसिक-प्रेक्षकांना खळखळून हसवणारं मराठमोळं व्यक्तीमत्त्व (Marathi Actor) म्हणजे, अशोक सराफ (Ashok Saraf)... आणि प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा. काही दिवसांपूर्वीच अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर, महाराष्ट्र सरकारकडूनही प्रतिष्ठीत 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार अशोक सराफांना प्रदान करण्यात आला. आता अशोक सराफांचा नवा सिनेमा येऊ घातलाय, या सिनेमात अशोकमामांसोबत संकर्षण कऱ्हाडे मुख्य भूमिकेत झळकला आहे. एकीकडे अशोक सराफ नव्या सिनेमामुळे चर्चेत आहेत, तर दुसरीकडे त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अक्षरशः थक्क करुन सोडतो. अशोकमामांचा स्वॅग, त्यांचा लूक आणि त्यांचा अंदाज पाहून अगदी धक्काच बसतो. 

Continues below advertisement

पद्मश्री अशोक सराफ (Marathi Actor Ashok Saraf) आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. कधीच कोणताही बडेजाव न करणारे अशोकमामा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मात्र, एकदम कूल अंदाजात दिसत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अशोकमामांचा साधेपणा दिसतोय, पण त्यानंतर जे पाहायला मिळतं, ते पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. व्हिडीओच्या सुरुवातीला अशोकमामा साध्या वेशात चालत येताना दिसतात. एका बिल्डिंगच्या एन्ट्रन्समधून अशोक सराफ एक खाकी रंगाचा कुर्ता आणि धोतर अशा पेहरावात चालत येतात, त्यासोबत त्यांनी ऑरेंज कलरचे फ्लिपफ्लॉप पायात घातलेले.  त्यानंतर ते तिथेच काही अंतरावर उभ्या असलेल्या लॅम्बोर्गिनीमध्ये बसतात. 

पण, लॅम्बोर्गिनीमध्ये बसताना ते जे करतात, त्या कृतीनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. लॅम्बोर्गिनीमध्ये बसताना अशोक सराफ आपल्या पायातले ऑरेंज फ्लिपफ्लॉप काढतात आणि गाडीत बसून झाल्यावर ते उचलून गाडीत ठेवतात. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आलाय. तसेच, चाहत्यांना अशोक सराफांचा स्वॅग फारच आवडलाय. पण, अनेकांनी या व्हिडीओवर प्रश्नही उपस्थित केलाय. अनेकांना शंका आलीय की, हा व्हिडीओ खरा आहे की, खोटा? खरं तर, अशोक सराफांचा व्हायरल होणारा व्हिडीओ AI जनरेटेड आहे. या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्यात. तर, अनेक चाहत्यांनी अशोकमामांना या लूकमध्ये पाहायला नक्की आवडेल, असंही म्हटलंय. 

Continues below advertisement

चाहत्यांनी हेरली अशोक सराफांच्या AI व्हिडीओतली चूक (Ashok Saraf AI Genrated Video Viral)

अशोक सराफांचा व्हायरल होणाऱ्या AI व्हिडीओमध्ये काही चुका नेटकऱ्यांनी हेरल्यात. अशोक सराफ ज्यावेळी लॅम्बोर्गिनीमध्ये बसतात, त्यावेळी त्यांचा पायात ऑरेंज कलरची फ्लिपफ्लॉप असते, पण ज्यावेळी ते लॅम्बोर्गिनीमधून उतरतात, त्यावेळी मात्र त्यांच्या पायात भलतीच चप्पल असते. याशिवाय गाडीत बसताना लॅम्बोर्गिनी आणि उतरताना ती गाडी फरारी असते, यावरुनच व्हायरल व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचं स्पष्ट झालंय. 

अशोकमामांच्या व्हायरल व्हिडीओवर स्वप्नील जोशीची कमेंट... (Ashok Saraf Lamborgini Car Video Viral)

अभिनेता स्वप्निल जोशीनं व्हिडीओवर कमेंट करत "This Is Lit" असं म्हटलं आहे. तर अनेक चाहत्यांनीही कमेंट केली आहे. अनेकांना अशोक सराफ यांचा हा व्हिडीओ पाहून सिनेमातील त्यांच्या यदुनाथ जवळकर या कॅरेक्टरची आठवण झाली आहे. काहींनी अशोकमामांच्या त्या लूकचे फोटोही कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट केलेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sankarshan Karhade on Ashok Saraf: 'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!