Ashok Saraf andn Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे महाराष्ट्र भूषण व पद्मश्री अशोक सराफ यांच्या 80 व्या वर्षात पदार्पण निमित्ताने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून सर्वांना मराठी सिनेमाची गोडी लावली आणि मराठी सिनेमाला एक उंची व लोकाभिमुखता दिली. अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा अभिनय अत्यंत सहज आहे त्यात कुठलीही कृत्रिमता जाणवत नाही, सहजतेने त्यांनी प्रत्येक भूमिका साकारल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. (Ashok Saraf Felicitation Ceremony)

Continues below advertisement

मराठी माणूस हा वास्तवात जगणारा आहे. त्यामुळे अशोक सराफ यांनी साकारलेल्या नायकामध्ये मराठी माणसाला स्वतःचे अस्तित्व दिसले आणि म्हणूनच अशोक सराफ हे खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनातील सुपरस्टार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. हास्यरस आणि त्याची पद्धत बदलत गेली. या सर्व गोष्टींना एक वेगळे वळण देण्याचे काम अशोक सराफ यांनी केले. टीव्हीवरील ‘हम पाँच’सारख्या मालिकांमध्ये सहजतेने हास्यरस निर्माण होणे हे पाहायला मिळायचे. त्यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही भरपूर काम केले. हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी आपले वेगळेपण दाखवून दिले, तसेच नाटकांच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीची सेवा केली. उत्तम कलावंतच नव्हे, तर उत्तम माणूस म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहू शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. यावेळी नागपूरच्या महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी आमदार संदीप जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Ashok Saraf: मला आजही नाटकात एन्ट्री घेताना थोडा धास्तावलेला असतो

मला संघर्ष फार कमी करावा लागला. मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं. काय करायचं आणि कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. विनोदात जास्त पसरलं नाही पाहिजे. तशा सर्व भूमिका अवघड. पात्र प्रत्यक्षात उतरविणे फार कठीण असते. तुम्ही चांगल्या रीतीने केल्यावर कठीण वाटत नाही. मात्र त्याआधी ती कठीण असते. मी नाटक आणि प्रयोग इतकी केली तरीही प्रयोगात एन्ट्री घेताना थोडं धास्तावलेला असतो. 

Continues below advertisement

आणखी वाचा

Ashok Saraf: 'एन्ट्री आधीच माझ्या पायजम्याची नाडी तुटली अन्..'; शोमध्ये अशोक सराफांनी सांगितला मजेदार किस्सा

Nivedita Saraf: अशोक मामांनी सिनेइंडस्ट्री गाजवली, त्यांचा मुलगा ऑक्सफोर्ड गाजवतोय; आई निवेदिता म्हणाल्या...