(Source: Poll of Polls)
VIDEO : बाजार गया था, अशोक सराफ आणि कादर खान सिनेमात बहिरे, एक सीन पाहून हसून हसून पोट दुखेल
Ashok Saraf and Kader Khan comedy scene : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि दिवंगत कादर खान याचा एका सिनेमातील कॉमेडी सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ashok Saraf and Kader Khan comedy scene : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि कादर खान (Kader Khan) यांचा एका सिनेमातील कॉमेडी सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (Ashok Saraf and Kader Khan comedy scene) हा सीन माँड-बेटी या बॉलिवूड सिनेमातील असून तो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरलाय. या सीनमध्ये अशोक सराफ आणि कादर खान हे दोघेही बहिरे असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या ऐकण्यात विसंगती दिसून येते. विसंगतीतूनच दोघांनी विनोदाची निर्मिती केली आहे.
'मा बेटी' हा हिंदी चित्रपट 8 ऑगस्ट 1986 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कल्पतरू यांनी केले असून, या चित्रपटात दिनेश हिंगू आणि शशी कपूर प्रमुख भूमिकेत दिसून येतात.
सिनेमाची स्टोरी काय?
सावित्री ही आपल्या व्यावसायिक पतीसोबत आणि मुलगी मीनू सोबत सुखी आणि श्रीमंत आयुष्य जगत असते. ती दुसऱ्यांदा गर्भवती राहते आणि केतन नावाच्या मुलाला जन्म देते, मात्र त्यानंतर तिचा मृत्यू होतो. तिचा पती व्यवसाय आणि दोन्ही मुलांची जबाबदारी एकट्याने पेलू शकत नसल्यामुळे लक्ष्मी नावाच्या महिलेशी पुन्हा लग्न करतो. लक्ष्मीला तिच्या भावाच्या म्हणजे रघुनंदनच्या वाईट हेतूंची कल्पना नसते. ती सावत्र मुलांना वाईट वागणूक देते, त्यामुळे ते घर सोडून निघून जातात. पण नंतर रघुनंदन सर्व संपत्ती लुबाडतो आणि लक्ष्मी व तिच्या कुटुंबाला घराबाहेर काढतो, त्यामुळे लक्ष्मीचे आयुष्य पूर्णपणे बदलते.
अशोक सराफ मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते..मात्र, हिंदी सिनेमात देखील त्यांनी आपल्या अभिनयाने नाव कमावलं. हिंदी सिनेमात लीड रोल मिळत नसले तरी अनेक विनोदी भूमिका करत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. करण अर्जुन, माँ बेटी या सिनेमात त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षक आज देखील आवडीने पाहात असतात. अशोक सराफ यांनी सिंघम, प्यार किया तो डरना क्या, गुप्त, कोयला, येस बॉस, जोरु का गुलाम अशा अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या



















