Cult Film Ashi Hi Banwa Banwi Shooting Kissa:  मराठी सिनेसृष्टीत (Marathi Movie) आजवर अनेक सिनेमे (Marathi Films) आले, ज्यातील काही सुपरडुपर हिट ठरले, तर काही सुपरफ्लॉप. पण काही चित्रपट असे आहेत, ज्यांनी त्या काळात तर प्रेक्षकांची मनं जिंकली, पण आजही असे सिनेमे प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. असाच एक मराठीतील कल्ट सिनेमाही म्हणू शकता, असा 'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) सिनेमा. 1988 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं रसिक-प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलंच, पण त्यासोबतच महाराष्ट्राला खळखळून हसवलं. या सिनेमातील डायलॉग्स आजही मराठी प्रेक्षकांच्या जिभेवर रुजले आहेत. हा सिनेमा कधीही लागला तरीसुद्धा सर्वांच्या माना त्याकडे वळतात. डोळ्यांच्या पापण्याही पडण्यापूर्वी परवानगी घेतात. 

Continues below advertisement


'अशी ही बनवाबनवी' सिनेमात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज स्टारकास्ट झळकली. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ, सिद्धार्थ रे या सर्व दिग्गज कलाकरांनी धम्माल उडवून दिली. आज या स्टारकास्टमधील दोन कलाकार आपल्यात नाहीत.


सिद्धार्थ रे आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी या जगाचा निरोप घेतला. पण, 'अशी ही बनवाबनवी'मधला पडद्यावरचा त्यांचा वावर आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या सिनेमाबाबत जेवढं बोलणार तेवढं कमीच... पण, तब्बल तीन दशकांहून अधिक काळ लोटला तरीसुद्धा हा चित्रपट काळाच्या पडद्याआड गेला नाही. पण, तुम्हाला माहितीय का? या सिनेमाचं शुटिंग नेमकं झालं कुठे? 


'अशी ही बनवाबनवी'चं शुटिंग कुठे झालं? 


मराठीतील कल्ट सिनेमा असलेल्या 'अशी ही बनवा बनवी'चं शुटिंग पुण्यात झालं. ज्यावेळी सगळे लीलाबाई काळभोर यांच्या पाषाण रोडवरच्या बंगल्यात भाडोत्री म्हणून राहायला जातात, तो पाषाण रोड आजही पुण्यात आहे. पण, ज्या बंगल्यात शुटिंग झालं, तो लीलाबाई काळभोर यांचा बंगला मात्र सिनेमाचा सेट होता, तो खराखुरा अस्तित्वात नाही... तो शुटिंगपुरता उभारण्यात आलेला. तर सिनेमात अशोक सराफ आणि अश्विनी भावेंची लव्हस्टोरी ज्या दुकानात फुलली, ते दुकान मात्र खरंखुरं होतं, 'अशी ही बनवाबनवी'चे दिग्दर्शक, निर्माते आणि सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या सचिन पिळगांवकरांच्या मित्राचं ते दुकान होतं. 'अशी ही बनवाबनवी'


याव्यतिरिक्त आजही आपल्या तालावर ठेका धरायला लावणारं सुपरहिट गाणं 'हृदयी वसंत फुलताना, प्रेमात रंग यावे...' हे गाणंही पुण्यातच शूट करण्यात आलेलं. पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी हे गाणं शूट करण्यात  आलं होतं. सिनेमातील काही सीन्स पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मुख्य बिल्डिंगमध्ये शूट केले होते. पुण्याशिवाय काही सीन्स कोल्हापूरमध्येही चित्रीत केल्याचंही सांगण्यात येतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'अशी ही बनवाबनवी' सिनेमाची स्क्रिप्ट लिहण्यात माझा महत्त्वाचा वाटा, '70 रुपये वारले' डायलॉग कोणी लिहिला? सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा