Ashi Hi Banwa Banwi Sachin Pilgaonkar Gemini Trend photos : वर्षाच्या सुरुवातीला सोशल मीडियावर "Ghibli" चा फोटो ट्रेंड सोशल मीडियावर फॉलो केला जात होता. मात्र, या वर्षातच सातत्याने फोटोचे ट्रेंड बदलत राहिलेले पाहायला मिळाले. सध्या Gemini च्या फोटोंचा ट्रेंड सोशल मीडियावरील महिला वर्गाकडून फॉलो केला जातोय. अनेक तरुणी देखील या पद्धतीने फोटो बनवून सोशल मीडियावर शेअर करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, अशातच अभिनेते सचिन पिळगावकर यांनी  अशी ही बनवा बनवी सिनेमात साकारलेल्या सुधा या पात्राचे Gemini ट्रेंड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी सुधाचे फोटो Gemini मध्ये बनवून घेतले आहेत. या फोटोंवर सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. 

Continues below advertisement






मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी चित्रपटांची परंपरा फार जुनी आहे. त्या परंपरेत आजही लोकप्रिय ठरलेला आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक चित्रपट म्हणजे अशी ही बनवा बनवी (1988). हा चित्रपट Sachin Pilgaonkar यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला असून लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्या अफलातून अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.  या चित्रपटात चार मित्र घर मिळवण्यासाठी खोट्या लग्नाची कथा रंगवतात. यातून घडणाऱ्या गंमतीजमती, गैरसमज आणि गमतीदार प्रसंग यामुळे प्रेक्षकांचे हसू थांबतच नाही. संवादातील खेळकरपणा, वेगवान टायमिंग आणि कलाकारांचा अभिनय यामुळे हा चित्रपट ‘क्लासिक कॉमेडी’ ठरला आहे.


या चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी साकारलेलं सुधा हे पात्र विशेष उल्लेखनीय आहे. ‘सुधा’ प्रत्यक्षात मुलगी नसून, सचिनने साकारलेलं मुलीचं रूप आहे. घरमालकिणीला भुरळ घालण्यासाठी व भाड्याचं घर मिळवण्यासाठी सुधा हे पात्र पुढे आणले जाते. सचिनने या स्त्री-पात्राचं केलेलं सादरीकरण इतकं जिवंत आणि नैसर्गिक वाटतं की, पहिल्यांदा पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही हा खरा स्त्रीपात्र आहे की काय अशी शंका येते. त्याचा हावभाव, बोलण्याची स्टाईल, चेहऱ्यावरील निरागसता, हातवारे आणि नजरेतून केलेली खट्याळ अदाकारी या सगळ्यामुळे सुधा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते.


सुधा या पात्रामुळेच संपूर्ण चित्रपटाचा गमतीदार रंग खुलतो. या पात्राभोवती अनेक विनोदी प्रसंग रचले गेले आहेत. एकीकडे लक्ष्मीकांत बेर्डेची  कॉमेडी, तर दुसरीकडे सुधा या रूपात सचिनचा अप्रतिम अभिनय – यामुळे चित्रपटाचं विनोदी मोल आणखी वाढतं. शेवटी अशी ही बनवा बनवी हा केवळ एक साधा विनोदी चित्रपट न ठरता मराठी सिनेसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरतो. आणि त्यात सचिन पिळगावकर यांनी केलेलं सुधा हे पात्र तर आजही प्रेक्षकांना हसवून हसवून डोळ्यात पाणी आणणारं आहे. अशी ही बनवा बनवी हा मराठीतील अतिशय महत्त्वाचा कल्ट सिनेमा म्हणून ओळखला जातो. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


खऱ्या आयुष्यातही गुंडगिरी करायचा तेजाब सिनेमातील 'लोटिया पठाण', एका मुलाखतीने आयुष्य बदललं अन् बनला बॉलिवूडचा व्हिलन!