Asha Bhosle Son In Law: सूरसम्राज्ञी आशा भोसले (Asha Bhosle) यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले (Actress Asha Bhosle) यांच्या जाण्यानं अख्खा देश शोकसागरात बुडालाय. त्यांच्या निधनानंतर अनेकजण त्यांचे किस्से, त्यांचे फोटो टाकून त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अगदी गझल, अभंग, भूपाळी पासून थेट तरुणांच्या मनाला भिडणारी 'दम मारो दम', 'ओम शांती ओम' यांसारख्या गाण्यांपर्यंत आशाताईंनी अनेक गाणी गायलीत. वर्सटाईल सिंगर असलेल्या आशाताईंनी आपल्या आवाजानं अनेक गाण्यांना न्याय दिलाय. पण, तुम्हाल माहितीय का? आशा भोसले यांचा जावई बॉलिवूडचा सुपरस्टार व्हिलन आहे. तर, आशाताईंची नात बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री आहे. तुम्ही ओळखलं का कोण?
दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या समृद्ध वारशाचा गौरव केला जात असतानाच, त्यांच्या कुटुंबाशी निगडीत एक रंजक बाब समोर आली आहे. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध खुंखार, सुपरस्टार खलनायक असलेला अभिनेता आशाताईंचा जावई आहे. आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलतोय, त्यांचं नाव शक्ति कपूर. सिनेमांमधल्या खलनायकाच्या आगळ्यावेगळ्या शैलीसाठी आणि त्यासोबत विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या शक्ति कपूर याचे आशा भोसले यांच्या कुटुंबाशी अगदी जवळचे आणि घनिष्ठ संबंध आहेत. दोन्ही कुटुंबामध्ये अगदी सलोख्याचं नात आहे. शक्ती कपूर यांची पत्नी, शिवांगी कोल्हापुरे, आशा भोसले यांची भाची आहे. त्याच नात्यानं, शक्ती कपूर हे आशा भोसले यांचे जावई लागतात. तर, श्रद्धा कपूर त्यांची नात लागते.
मेहुणीचे कन्यादान करणारा 'जावई'
1980 च्या दशकातील एक आघाडीची अभिनेत्री असलेल्या पद्मिनी कोल्हापुरे या शिवांगी कोल्हापुरे यांच्या सख्ख्यी बहीण आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, पद्मिनी कोल्हापुरे या शक्ती कपूर यांच्या मेहुणी आहेत. यातील एक विशेष आणि लक्षवेधी बाब म्हणजे, जेव्हा पद्मिनी कोल्हापुरे यांनी निर्माते प्रदीप शर्मा यांच्याशी विवाह केला, तेव्हा खुद्द शक्ती कपूर यांनीच त्यांच्या लग्नात 'कन्यादाना'चा विधी पार पाडला होता. आजही, ही घटना बॉलिवूडमधील कौटुंबिक किस्स्यांमधील एक अत्यंत अनोखी आणि अविस्मरणीय आठवण म्हणून ओळखली जाते.
श्रद्धा कपूरच्या 'आज्जी' होत्या आशा भोसले
कपूर आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या नात्यातली पुढची पिढी श्रद्धा कपूर आणि आशा भोसले यांचं नातं. आशा भोसले या श्रद्धा कपूर यांच्या आजी आहेत. श्रद्धा कपूरची आई शिवांगी कोल्हापूरे कपूर. श्रद्धाच्या आईचे वडील म्हणजे, श्रद्धाचे आजोबा पंढरीनाथ कोल्हापुरे. जे दीनानाथ मंगेशकर यांचे भाचे आणि भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले यांचे मामेभाऊ लागायचे. याच नात्यानं आशाताई श्रद्धाच्या आजी लागतात. श्रद्धानं कित्येकत्या तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन आशाताईंसोबतचे गोड क्षण शेअर केले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
