Asha Bhosle Sang Song With Cricketer Brett Lee: हिंदी सिनेसृष्टीतील (Hindi Film Industry) प्रसिद्ध आणि दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले (Playback Singer Asha Bhosle) यांनी वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) त्यांचं निधन झालं. हिंदी सिनेसृष्टीची सुपरस्टार सिंगर कोण? असं विचारलं तर सर्वात आधी आशाताईंचं नाव ओठी येतं. आशा भोसले (Asha Bhosle) संगीतातील विविध प्रयोगांसाठी ओळखल्या जातात. त्यांनी 20 हून अधिक भाषांमध्ये तब्बल 12 हजारांहून अधिक गाणी गायली. पण, आशाताईंचं जेवढं प्रेम संगीतावर असलं तरीसुद्धा त्यांना क्रिकेटची आवड होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तर त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक. कदाचितच कुणाला ठाऊक असेल आशा भोसले यांनी एका दिग्गज क्रिकेटरसोबत (Legendary Cricketer) एक गाणं गायलेलं. महत्त्वाची बाब म्हणजे, या गाण्याचे बोल हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये होतं. 

आशा भोसले यांनी ज्या क्रिकेटरसोबत गाणं गायलेलं, तो ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली. ब्रेट लीसोबत आशाताईंनी 'यू आर द वन' (You Are the One) या गाण्यासाठी काम केलेलं. या गाण्याचे बोल हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये होते. आशा भोसले यांनी हिंदी कडवी गायलेली, तर ब्रेट लीनं इंग्रजी कडवी सादर केलेली. 2006 च्या 'आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी' दरम्यान प्रदर्शित झालेलं हे गाणं खुद्द ब्रेट लीनंच लिहिलं होतं.

आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात सादर झालेलं हे गाणं भारतात प्रचंड गाजलेलं आणि आजही युट्यूबवर या गाण्याची क्रेझ कायम आहे. ज्या सचिन तेंडुलकर याला क्रिकेटच्या मैदानावरील 'देव' मानलं जातं, तोसुद्धा आशाताईंच्या गाण्यांचा चाहता आहे.  आशा भोसले यांनी अनेकदा सचिनचा उल्लेख क्रिकेट विश्वातील 'महान कलाकार' असा केलाय. क्रिकेट किंवा संगीत यासोबत विविध कार्यक्रमांमध्ये त्या अनेकदा सचिन तेंडुलकर याच्यासोबत दिसून आल्यात.

आशाताईंनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास  (Asha Bhosle Death)

आशा भोसले यांची प्रकृती गेल्या काही काळापासून अस्वस्थ होती. प्रकृतीमध्ये गंभीर बिघाड झाल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यांच्या निधनानंतर, रुग्णालयातील डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितलं की, मल्टीपल ऑर्गन फेल्युअरमुळे (Multi Organ Failure) आशा भोसले यांचं निधन झालंय. प्रसारमाध्यमांशी बोलताना, आशाताईंचे पुत्र आनंद भोसले यांनी जाहीर केलं की, दिग्गज गायिका आशा भोसले यांचं पार्थिव शरीर सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क इथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आशाताईंची कारकीर्द (Asha Bhosle Career Graph)

आशा भोसले यांनी गायलेल्या अत्यंत लोकप्रिय गीतांमध्ये 'पिया तू अब तो आजा', 'दम मारो दम', 'ये मेरा दिल', 'चुरा लिया है तुमने', 'इन आँखों की मस्ती के' आणि 'दिल चीज़ क्या है' यांसारख्या गीतांचा प्रामुख्यानं समावेश होतो. सिनेसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील त्यांच्या अजोड योगदानाची दखल घेऊन, त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कारांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

आशा भोसले आणि ब्रेट लीचं गाणं पाहिलंत?

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Asha Bhosle Granddaughter Is Bollywood Superstar: आशा भोसले यांची नात बॉलिवूडची सुपरस्टार; तिच्या नावावरच सुपरहिट होतो सिनेमा, तर वडील खुंखार खलनायक, ओळखलं का कोण?