Asha Bhosle Last Post: सूरसम्राज्ञी आणि दिग्गज गायिका आशा भोसले (Versatile Playback Singer Asha Bhosle) यांचं 12 एप्रिल 2026 रोजी निधन झालं. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास आशाताईंना प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईतील (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती आणखीच खालावल्यामुळे आशाताईंचं निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंचं (Asha Bhosle Death) असं जाणं केवळ सिनेसृष्टीच नाहीतर संपूर्ण देशासाठीच दुःखाचा डोंगर कोसळण्यासारखं आहे. अशातच आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनानंतर आता त्यांची अखेरची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल (Asha Bhosle Last Social Media Post) होत आहे. त्यांनी 18 मार्च रोजी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केलेली. आशाताईंनी केलेली पोस्ट क्रिएटिव्ह पोस्ट आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपलं गाणं 'द शेडोई लाइट'सोबत आयुष्य आणि मोक्ष याबाबत लिहिलेलं.
आशा भोसले यांची शेवटची पोस्ट VIRAL (Asha Bhosle Last Social Media Post Viral)
दिग्गज गायिका आशा भोसले यांनी त्यांच्या शेवटच्या पोस्टमध्ये इंटरनेशनल बँड 'गोरिल्लाज' सोबत दिसलेल्या. फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये भारतीय वस्त्या, हत्ती आणि जीर्ण झालेल्या वस्तूंची दृश्य पाहायला मिळतायत. दरम्यान, यासोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, " 'The Shadowy Light' या गाण्याचा माझ्यासाठी अत्यंत सखोल अर्थ आहे. वाराणसीला भेट देऊन आणि पवित्र गंगा नदीच्या काठानं प्रवास करून, तसेच तिथे मला जे काही दिसलं, त्याचं बारकाईनं निरीक्षण करून आणि ते समजून घेऊन, मला जीवनाचा खरा अर्थ उमजला, मी कोण आहे आणि या पृथ्वीवर माझे काय प्रयोजन आहे..."
आशाताईंनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलेलं की, 'द शॅडोई लाइट' (The Shadowy Light) मध्ये, या खोल नदीचा पैलतीर गाठणं हे माझ्या जीवनप्रवासाचं प्रतीक आहे, माझा जन्म, माझे नातेसंबंध, संगीताप्रतीची माझी निष्ठा, माझी कर्तृत्व आणि एक कन्या, माता, भगिनी, पत्नी आणि एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्य. या प्रवासात, 'संगीत' हाच माझा नावाडी आहे, तो मार्गदर्शक, जो मला या जीवननदीच्या पैलतीरी घेऊन जातो. जेव्हा मी त्या पैलतीरावर पोहोचेन, तेव्हा माझा हा प्रवास पूर्ण होईल. तेव्हा मला 'मोक्ष' प्राप्त होईल, आपल्या सभोवताली सतत तरंगणाऱ्या अगणित नादांमध्ये मी विलीन होईन.
आशा भोसले यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या शेवटी लिहिलंय की, "जेव्हा त्यातील काही नाद एकत्र गुंफले जातात, तेव्हा त्यातून एक सुंदर सुरावट निर्माण होते. त्याचप्रमाणे, मी देखील त्या नादांपैकीच एक नाद बनेन, असा नाद, जो अंतिमतः एका सुंदर गीतातील सुराचं रूप धारण करेल. असं गीत, जे पिढ्यानपिढ्या, हजारो वर्षे सातत्यानं ऐकलं जात राहील. हेच स्वातंत्र्य, निसर्गाशी एकरूप होण्याचं स्वातंत्र्य, नदीच्या पलीकडील तीरावर माझी वाट पाहत आहे..." दरम्यान, आशा भोसले यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर, चाहते याकडे एका 'पूर्वाभास' (Premonition) म्हणून पाहत आहेत.
मल्टी-ऑर्गन फेलियोरीमुळे निधन (Asha Bhosle Death News)
ANI शी बोलताना डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितलं की, आशा भोसले यांनी आज ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मल्टी-ऑर्गन फेलियोरीमुळे (Multi Organ Failure) त्यांचं निधन झालं. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना गायिकेच्या मुलानं, आनंद भोसले यांनी, माहिती दिली की, आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार पार पडतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
