Asha Bhosle Granddaughter Is Bollywood Superstar: बॉलिवूडच्या (Bollywood News) सुपरस्टार गायिका (Superstar Singer) असं जर कुणाला म्हणायचं झालंच, तर सर्वात आधी आशा भोसले (Asha Bhosle) यांचंच नाव समोर येतं. तब्बल सहा दशकं आशाताईंनी अनेक सुपरहिट गाण्यांमार्फत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अगदी गझल, अभंग, भूपाळी पासून थेट तरुणांच्या मनाला भिडणारी 'दम मारो दम', 'ओम शांती ओम' यांसारख्या गाण्यांपर्यंत आशाताईंनी अनेक गाणी गायलीत. वर्सटाईल सिंगर असलेल्या आशाताईंनी आपल्या आवाजानं अनेक गाण्यांना न्याय दिलाय. फक्त मराठी, हिंदीच नाहीतर त्याव्यतिरिक्त तब्बल 20 भाषांमध्ये आशाताईंनी गाणी गायली. पण, तुम्हाला माहितीय का? आशा भोसले (Asha Bhosle Passed Away) यांची नात बॉलिवूडची लेडी सुपरस्टार आहे. आशा भोसलेंची लाडकी नात जनाई भोसलेबाबत आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पण, त्याव्यतिरिक्त आशाताईंची आणखी एक नात आहे, जी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतेय. आज तिची गणना बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्रींमध्ये केली जाते. जिच्या फक्त नावावरत सिनेमे हिट होतात. तर, तिचे वडील खुंखार खलनायक आहेत. तुम्ही ओळखता का तिला?
आम्ही ज्या आशा भोसले यांच्या नातीबाबत बोलतोय ती, सुपरस्टार अभिनेत्री म्हणजे, श्रद्धा कपूर. फारच कमी लोकांना ठाऊक आहे की, श्रद्धा कपूर आणि आशा भोसले यांच्यात आजी आणि नातीचं नातं आहे. श्रद्धा कपूरची आई शिवांगी कोल्हापूरे कपूर आहे. श्रद्धाच्या आईचे वडील म्हणजे, श्रद्धाचे आजोबा पंढरीनाथ कोल्हापुरे. जे दीनानाथ मंगेशकर यांचे भाचे आणि भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले यांचे मामेभाऊ लागायचे. याच नात्यानं आशाताई श्रद्धाच्या आजी लागतात. श्रद्धानं कित्येकत्या तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन आशाताईंसोबतचे गोड क्षण शेअर केले आहेत.
श्रद्धा कपूरचं हिट करियर
श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील एक जबरदस्त खलनायक आणि ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या. आज श्रद्धानं आपल्या अभिनय कौशल्यानं बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये स्थान पटकावलं आहे. तिनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2010 मध्ये 'तीन पत्ती' या सिनेमाद्वारे केली. त्यानंतर ती 'एक व्हिलन', 'आशिकी 2', 'ABCD 2', 'बाघी', 'हसीना पारकर', 'हाफ गर्लफ्रेंड', 'स्त्री' आणि रणबीर कपूरसोबत 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमांमध्ये झळकली आहे. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा म्हणजे 'स्त्री 2', ज्यानं बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवलंय आणि वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत आपलं स्थान पक्कं केलंय.
सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार होती, पण...
श्रद्धा कपूरला कदाचित सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली नसेल, पण फार कमी लोकांना हे ठाऊक आहे की, तिच्या सिने कारकिर्दीची सुरुवात होण्यापूर्वी, परदेशात शिक्षण घेत असताना तिनं एका कॉफी शॉपमध्ये काम केलं होतं. याच काळात, वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी, तिला सुपरस्टार सलमान खानसोबत काम करण्याची ऑफर मिळाली होती. मात्र, आपल्या शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी तिनं ती ऑफर नाकारली. आज, तिनं रणबीर कपूर, राजकुमार राव, अर्जुन कपूर आणि सुशांत सिंह राजपूत यांसारख्या स्टार्ससोबत काम केलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
