Rajinikanths Humanity Remembered by Co-Star Arwind: स्टोरी कोणतीही असो सुपरस्टार रजनीकांत चित्रपटात असल्यावर सिनेमा हिट होणार हे निश्चित. रजनीकांत यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहे. त्यांच्या अॅक्शन आणि स्टाईलवर चाहते फिदा आहेत. त्यांनी केवळ अभिनयातूनच नाही तर, स्वभावाने देखील लाखो लोकांची मने जिंकली आहेत. रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीत पाच दशके पूर्ण केली आहेत. त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. रजनीकांत यांनी जितक्या सुंदरपणे आपले पात्र पडद्यावर साकारले आहेत, तितकेच ते खऱ्या आयुष्यातही दयाळू आहेत. त्यांच्यातील माणुसकी ही कायम दिसून येते. अलिकडेच अभिनेते अरविंद स्वामी यांनी रजनीकांत यांच्या साभेपणा आणि दयाळूपणाबद्दल सांगितले. यामुळे रजनीकांत यांची वेगळी बाजू चाहत्यांसमोर आली आहे.
1991 साली थलापती या चित्रपटातून अरविंद स्वामी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत आणा मामूटी यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती. मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात बोलताना अरविंद यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:ला नेमकं कसे स्थापित केले, याची माहिती दिली. तसेच रजनीकांत यांची कशी मदत झाली, याची माहिती दिली. "मी एकदा सेटवर शूटिंगसाठी गेलो होतो. मी प्रचंड थकलो होतो. बेडरूम दिसताच मी झोपून गेलो. मला माहित नव्हते ही खोली रजनीकांत यांची आहे. मी जेव्हा जागा झालो तेव्हा रजनीकांत यांना जमिनीवर पाहून धक्का बसला, ते खाली झोपले होते. तेव्हा मला खूप लाज वाटली. मी नवोदित कलाकार होतो. असे असून देखील त्यांनी मला उठवून बाहेर जाण्यास सांगितले नाही".
त्या घटनेची आठवण करून देताना अरविंद म्हणाला, "मी झोपेतून उठलो आणि रजनीकांत सरांना जमिनीवर झोपलेले पाहिलं. मी चुकून त्यांच्या खोलीत शिरलो. त्यांच्या बेडवर झोपलो" , यानंतर रजनीकांत यांचा मेकअप आर्टिस्ट यांनी सांगितले की, "रजनीकांत यांनी तुम्हाला न उठवण्याच्या सूचना दिल्या होत्या". यातून रजनीकांत यांची नम्र आणि दयाळू बाजू पुन्हा एकदा समोर आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या: