मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) आपल्या विनोदाने वेड लावणारा अभिनेता ओंकार भोजने (Omkar Bhojane) पुन्हा एकदा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या (Maharashtrachi Hasyajatra) मंचावर परतला आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून ओंकार घराघरात पोहोचला. त्याच 'अगं अगं आई...' म्हणणारा ओंक्या हे पात्र असो वा 'हा इथे काय करतोय' विचारणाऱ्या मामा ची भूमिका... भोजने ने आपल्या विनोदाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

Continues below advertisement

वृद्धाश्रमात साजरा केला दिवाळीचा आनंदोत्सव

ओंकार भोजनेने (Omkar Bhojane) आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवलं. प्रेक्षकांच्या या मागणीला मान देत ओंकार भोजने पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात परत आहे. त्याचा परत येण्याने प्रेक्षकांना दिवाळीच बोनस  नक्कीच मिळाला आहे.  त्याच दिवाळीच अवचित्त साधून सोनी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकारांनी यंदाची दिवाळी एका अत्यंत खास आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी केली आहे. नेहमीच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी ही टीम, दिवाळीचा आनंद गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईतील बोरिवली येथील सिटीझन वेलफेर असोसिएशन या वृद्धाश्रमाला (Old Age Home) पोहोचली होती.

यावेळी नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पुनरागमन करणारा ओंकार भोजने उपस्थित होता.  सोबतच शिवाली परब, वनिता खरात हे कलाकार उपस्थित होते. सोबतच कार्यक्रमाचे सर्वेसर्वा निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक निर्माते सचिन मोटे देखील उपस्थित होते. यावेळी सगळ्या कलाकारांनी वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांसोबत वेळ घालवला. सोबतच त्यांच्यासोबत फराळाचा आनंद देखील घेतला. त्यांच्या तब्बेतीची विचारपूस देखिल केली. नेहमी टीव्ही वर आपल्या लाडक्या विनोदवीरांना ते नेहमीच पाहतात पण आता प्रत्यक्षात त्यांना पाहताना वृद्धाश्रमातील मंडळींच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.  

Continues below advertisement

कलाकारांनी ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं

महाराष्ट्राची हास्यजत्रा या टीमने बोरिवली येथील एका वृद्धाश्रमात जाऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली. अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटुंबापासून दूर राहतात, अशा वेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमच्या आगमनाने त्यांना कुटुंबातील सदस्यांचा सहवास लाभल्यासारखे वाटले. कलाकारांनी त्यांच्या आवडत्या स्किट्स बद्दल गप्पा मारल्या आणि त्यांच्याशी संवाद साधून ज्येष्ठांच्या चेहहऱ्यावर हसू उमटवलं.

महत्वाच्या बातम्या:

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; चाहते म्हणाले,"ओंकार भोजनेला परत आणा"