Cricketer Arshdeep Singh Relationship Rumours: क्रिकेटर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) एका बाजूला IPL 2026 मध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी करतोय. तर दुसऱ्या बाजूला त्याची लव्ह लाईफही चर्चेचा विषय ठरतेय. सोशल मीडियावर त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे.  तो  पंजाबी अभिनेत्री समरीन कौरला (Samreen Kaur) डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघेही अलीकडे अनेकदा एकत्र दिसत आहेत. समरीन अनेकदा अर्शदीपला सपोर्ट करण्यासाठी  IPL सामन्यांमध्ये spot झालीय. दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, त्यांच्या भेटीगाठी आणि मैदानावर अभिनेत्रीची उपस्थिती चर्चेत आहे. गुरुवारी समरीन पंजाब किंग्सला सपोर्ट करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहोचली होती. पॅपराझींशी बोलताना तिने पंजाब किंग्सच्या विजयाबद्दल आनंदही व्यक्त केलेला. अर्शदीप आणि समरीनच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे.  

Continues below advertisement

समरीन कौरला डेट करत असल्याच्या चर्चा

ही चर्चा अधिक रंगली जेव्हा अर्शदीपने Snapchat वर एका मिस्टरी गर्ल सोबत फोटो शेअर केला होता. त्या मुलीच्या हातावर असलेल्या टॅटूची तुलना समरीनच्या सोशल मीडिया पोस्टमधील टॅटूसोबत करण्यात आली. त्यानंतर दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचा चर्चा वेगाने पसरल्या. इतकच नाही तर समरीनला चंदिगडमधील महाराजा यदविंद्र सिंग स्टेडियममध्ये पाहिलं गेल्याने या फोन आणखी बळ मिळालं. अर्शदीप आणि समरीनची जोडी चाहत्यांनाही आवडली आहे. अनेकजण त्या दोघांची जोडी आवडल्याचं त्यांना कळवत आहेत.  अर्शदीपला लग्नाविषयी विचारलं जात आहे. काही दिवसांपूर्वी हर्षदीपने ही प्रतिक्रिया दिली होती. TV9 भारत वर्षला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणालेला," आता लगेच लग्न करायचं नाही ' बाबांचा एक इंटरव्ह्यू आला होता, त्यात त्यांनी मला तीन-चार वर्षांची मुभा दिली आहे असं त्याने पुढे सांगितलेलं.

 

कोण आहे समरीन कौर ?

समरीन कव्हर ही पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल आहे . तिचा जन्म जम्मू-काश्मीरमध्ये झालाय. तिने फॅशन इंडस्ट्रीतून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि रॅम्प वॉक पासून टीव्ही जाहिरातींपर्यंतचा प्रवास केला. 2018 मदतीने सेमिना मिस इंडिया स्पर्धेसाठी ऑडिशन दिली होती. जम्मू काश्मीर मधून स्टेट फायनल लिस्ट ठरलेल्या समरीन कौरने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतही काम केलंय. गुरु रंधावा आणि बादशहासारख्या प्रसिद्ध कलाकारांसोबत ती झळकली आहे. समरीनने ' 83 ' चित्रपटात भूमिका साकारली होती. यात तिने माझी क्रिकेटर बलविंदर सिंह सिंधू यांच्या होणाऱ्या बायकोची भूमिका साकारलेली. सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधनं तिने शिक्षण पूर्ण केलं आहे . बारावी पूर्ण होईपर्यंत तिने पहिली अभिनयाची ऑफर्स स्वीकारली नव्हती. नंतर तिची 'यारा तेरे वर्गा ' आणि 'बावला ' सारख्या गाण्यांमध्ये झलक दिसला . सरदारजी टू या पंजाबी चित्रपटातूनही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.