YouTuber Armaan Malik Death Threat: हरियाणातील युट्यूबर अरमान मलिकला (Armaan Malik) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोन करणाऱ्याने 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. त्यानंतर, युट्यूबरने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याने सांगितले की, गेल्या 20 दिवसांपासून त्याला सतत धमकीचे फोन येत आहेत. अरमानने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची भीती बाळगून पोलिसांकडून तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. (Death Threat)

Continues below advertisement

बिग बॉस ओटीटी सीजन 3' मध्ये झळकल्यानंतर अरमान मलिक आणि त्यांच्या दोन पत्नींची वैयक्तिक आयुष्यं नेहमीच चर्चेत राहिली आहेत. आता या धमकी प्रकरणामुळे ते पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

1 कोटी रुपयांची खंडणीची मागणी

Continues below advertisement

अरमान त्याच्या दोन्ही बायका आणि मुलांसह मोहालीच्या झिरकपूर येथे राहतो. त्याची पहिली पत्नी पायल ही गरोदर आहे. ती नव्या पाहुण्याच्या प्रतीक्षेत आहे. अरमानने पोलिसांना सांगितले की, "गेल्या 20 दिवसांपासून त्याला खंडणीचे फोन येत आहेत. तो नुकताच एका कार्यक्रमासाठी दुबईला गेला होता. त्यानंतर त्याला परदेशी नंबरवरून फोन आणि मेसेज येत आहेत. जेव्हा त्याने कॉल उचलणे बंद केले तेव्हा लोकांनी त्याची पत्नी पायलला फोन करून खंडणी मागितली.

कुटुंबालाही जीवे मारण्याची धमकी 

अरमान मलिक यांनी सांगितले की त्यांच्या मुलांना धमक्या मिळत असल्याने ते सर्वात जास्त चिंतित आहे. “पैसा कमी-जास्त होऊ शकतो, पण मुलांचे सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकरणामुळे अरमान आणि त्यांच्या कुटुंबात तणावाचे वातावरण असून, त्यांना आशा आहे की पोलीस लवकरात लवकर कारवाई करून आरोपींचा शोध घेतील. 

अरमान मलिकचा शत्रू कोण आहे?

पोलिस तक्रारीत, अरमान मलिकला फोन करणारा कोणीतरी त्याच्या जवळचा असल्याचा संशय आला. जेव्हा त्याने फोन उचलला नाही तेव्हा त्याची पहिली पत्नी पायलला फोन येऊ लागले. फक्त जवळच्या नातेवाईकांना त्याची पत्नी पायलचा फोन वापरता येतो. त्याने असेही म्हटले की फोन करणाऱ्याने कोणत्याही गुंडांचे नाव घेतले नाही. तो फक्त पैशाची मागणी करत होता. सुरुवातीला त्यांनी 5 कोटी (5 कोटी रुपये), नंतर 30 लाख (3 कोटी रुपये) आणि आता ते 1 कोटी (1 कोटी रुपये) मागत आहेत. अरमान मलिक म्हणाला की त्याचे कोणाशीही शत्रुत्व नाही. मात्र, धमक्यांनंतर त्याला त्याच्या मुलांच्या सुरक्षेची भीती वाटते,  असं तो म्हणाला.