Arjun Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हे गेली काही वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळते. अर्जुननं मुंबईमध्ये मलायकाच्या घराजवळचा फ्लॅट खरेदी केला होता. आता हाच फ्लॅट विकण्याचा निर्णय अर्जुननं घेतला आहे.  

Continues below advertisement


2021 मध्ये अर्जुननं मुंबईमधील वांद्रे भागामध्ये एक फ्लॅट अर्जुननं खरेदी केला होता. हा 4BHK फ्लॅट अर्जुननं 20 कोटीला खरेदी केला होता. गर्लफ्रेंड मलायका अरोरा राहते त्याच बिल्डिंगमध्ये अर्जुनचा हा फ्लॅट होता. केसी मार्गावरील 81 ऑरिएट इमारतीच्या 19व्या मजल्यावर असणारा अर्जुनचा हा फ्लॅट 4364 स्क्वेअर फूट होता. रिपोर्ट्सनुसार अर्जुनने आपला फ्लॅट 16 कोटींना विकला आहे. सेल  डॉक्यूमेंट्ची नोंदणी 19 मे रोजी झाली. अर्जुनची बहीण अंशुलाने सेलच्या डॉक्यूमेंट्वर सही केली. सध्या अर्जुन हा  जुहूमधील रहेजा ऑर्चिडच्या सातव्या मजल्यावर राहात आहे. 


अर्जुनचे आगामी चित्रपट 
लवकरच अर्जुनचा  ‘एक व्हिलन रिटर्न्स’हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटामध्ये अर्जुनसोबतच अभिनेता जॉन अब्राहम, दिशा पाटनी आणि तारा सुतारिया हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा 2014 मघ्ये रिलीज झालेल्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’चित्रपटाचा दुसरा भाग आहे. 29 जुलै 2022 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 


मलायका आणि अर्जुनची लव्ह स्टोरी


मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मलायका ही नेहमी ट्रोलर्सला उत्तर देत असते.


हेही वाचा: