Archana Puran Singh On Not Getting Work: 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्याऐवजी खुर्चीवर बसणारी अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) कित्येक वर्षांपासून फिल्मी जगतात काम करतेय. अर्चनाला इंडस्ट्रीत 44 वर्ष पूर्ण झालीत, तरीसुद्धा आजच्या काळात काम मिळवण्यासाठी अभिनेत्रीला झगडावं लागतंय. स्वतः अर्चना पूरण सिंहनं या गोष्टीचा खुलासा केलाय. एवढंच नाहीतर, तिनं हेदेखील सांगितलंय की, 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show On Netflix) केल्याचा तिला आता पश्च्याताप होतोय. कधीकाळी फक्त आणि फक्त 'द कपिल शर्मा शो'साठी तिनं कित्येक फिल्म्स धुडकावल्यात. पण, आज तिला कामच मिळेनासं झालंय, असंही तिनं सांगितलंय.
कपिल शर्मा शोसाठी धुडकावल्या फिल्म्स (Rejected Films For The Kapil Sharma Show)
अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) नुकतीच नेटफ्लिक्सवरच्या 'टोस्टर'मध्ये दिसून आलेली. या फिल्मच्या प्रमोशनसाठी ती अनेक इव्हेंट्समध्ये उपस्थित होती. याच निमित्तानं अर्चनानं न्यूज 18 ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिनं सांगितलं की, तिला आता दिग्दर्शक सीरियसली घेत नाहीत.
अर्जना सिंह म्हणाली की, गेल्या काही वर्षांपासून मी फिल्म्समध्ये काम करू शकलेली नाही. एकदा मला एक फोन आलेला आणि त्यांना मला एका शूटसाठी 25 दिवसांसाठी स्कॉटलँडला न्यायचं होतं. पण, त्यावेळी माझ्यासाठी कपिल शर्माच्या शोची शुटिंग सोडून इतर कुठे फिल्मची शुटिंग करणं अशक्यच होतं. पहिल्यांदा ज्यावेळी हा शो टीव्हीवर यायचा, त्यावेळी आम्ही वर्षातून 100 एपिसोड्स शूट करायचो. त्यामुळे माझ्याकडे इतर काहीही करण्यासाठी वेळच नसायचा.
फिल्म्ससाठी तरसतेय अभिनेत्री (Archana Puran Singh Not Getting Films)
पुढे बोलताना अभिनेत्री अर्चना पूरन सिंह म्हणाली की, कपिलच्या शोमुळे मला अनेक सिनेमांच्या ऑफर्स नाकाराव्या लागल्या. इतक्या वेळा मी प्रोजेक्ट्स नाकारलेत की, आता निर्मात्यांनी मला विचारणंच बंद केलंय, असं अभिनेत्रीनं सांगितलं. कितीही प्रयत्न केला तरी मी एक अभिनेत्री आहे, यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. सध्या कुणीही मला भूमिका ऑफर करत नाही, कारण त्यांच्या दृष्टीनं मी अजूनही फक्त खुर्चीवर बसून हसणारी व्यक्तीच आहे. मात्र, आता 'द ग्रेट इंडियन कपिल शो' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असल्यानं आपल्या करिअरला नवी दिशा मिळेल, अशी आशा तिनं व्यक्त केलीय.
OTT मुळे नवी संधी (Archana Puran Singh In Toster Movie)
ओटीटीमुळे आपल्याला नवी संधी मिळाल्याचंही अर्चना पूरन सिंहनं सांगितलं आहे. बोलताना ती म्हणाली की, "आता हा शो सीझननुसार शूट होतो, ज्यामुळे मला वर्षभर भारतातच राहण्याची गरज नसते. आता मी प्रवास करू शकते आणि इतर प्रोजेक्ट्सचं शुटिंगही करू शकते. म्हणूनच हा शो नेटफ्लिक्सवर येत असल्याचा मला खूप आनंद आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
