Arbaaz Khan Became Father At Age Of 58: अरबाज खान (Arbaaz Khan) आणि त्याची पत्नी शूरा खान (Sshura Khan) यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं आहे. शूरा खानला 4 ऑक्टोबर रोजी मुंबईतील प्रसिद्ध अशा हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मिडिया रिपोर्टनुसार, 5 ऑक्टोबर रोजी या जोडप्यानं एका मुलीचं स्वागत केलं. सलमान खान (Salman Khan) देखील त्याच्या पनवेल फार्महाऊसवरुन त्याच्या कुटुंबासह आनंदात सहभागी होण्यासाठी मुंबईत पोहोचला.
शूरा खान आणि अरबाज खानचं दुसरं लग्न आहे. अभिनेत्याचं यापूर्वी 1998 मध्ये मलायका अरोराशी लग्न करुन संसार थाटलेला. पण 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांनीही 19 वर्षांच्या सुखी संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनाही एक मुलगा आहे, ज्याचं नाव अरहान खान आहे. घटस्फोटानंतर अरबाज खाननं शूरा खानशी लग्न केलं. तर, अरबाज खानशी घटस्फोटानंतर मलायका खानचं सूत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींचा मुलगा अर्जुन कपूरसोबत जुळलेलं. पण, दोघांचा नातं फार काळ टिकलं नाही. दोघांचाही ब्रेकअप झाला. सध्या मलायका सिंगल आहे.
शूरा खानच्या बेबी शॉवरचा घातलेला जंगी थाट
अरबाज खाननं अलिकडेच शूरा खानचा बेबी शॉवर साजरा केला. सलमान खान त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला. जूनमध्ये अरबाजनं त्याची पत्नी शूरा गर्भवती असल्याची गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. त्यानं दिल्ली टाईम्सला सांगितलेलं की, "हो, हे खरं आहे. मी ते नाकारत नाही, कारण ही गूड न्यूज आधीच तुम्हाला मिळाली आहे... माझ्या कुटुंबाला माहिती आहे आणि आता ही बातमी सार्वजनिक झाली आहे. आमच्या दोघांसाठीही हा एक अतिशय आनंदाचा काळ आहे. आम्ही आनंदी आहोत आणि आमच्या आयुष्यातल्या नव्या अध्यायाची वाट पाहत आहोत..."
अरबाज खान त्याची पत्नी शूरापेक्षा 25 वर्षांनी मोठा
अरबाज खानची पत्नी शूरा त्याच्यापेक्षा जवळजवळ 25 वर्षांनी लहान आहे. दोघांची प्रेमकहाणी 'पटना शुक्ला' या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली, ज्यामध्ये शूरा खाननं मुख्य अभिनेत्री रवीना टंडनसोबत काम केलं होतं. दोघांनी त्यांचं प्रेम जगासमोर आणण्यापूर्वी एकमेकांना सुमारे दोन वर्ष डेट केलं. अरबाज खानच्या कुटुंबाला त्यांच्या रिलेशनबाबत अजिबात माहिती नव्हती, पण जेव्हा कुटुंबीयांना शूरा आणि अरबाज यांच्यातील एकमेकांबद्दलचा आदर आणि वचनबद्धता दिसली, तेव्हा त्यांनी लग्न करण्याच्या त्यांच्या निर्णयाला पाठींबा दिला.