ए आर रेहमान यांच्यावर गाणं चोरल्याचा आरोप; सुप्रीम कोर्टापर्यंत वाद गेला, घडलं काय ?
हा वाद संपतो न संपतो तोच संगीतकार ए आर रहमान यांच्यावर एक जुनी रचना चोरल्याचा आरोप करण्यात आलाय.

A.R.Rehman: आपल्या नव्या, सर्जनशील आणि आगळ्यावेगळ्या गाण्याचा रचनांसाठी प्रसिद्ध असणारे ए. आर. रहमान गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या आठ वर्षात झालेल्या पॉवर शिफ्ट आणि सांप्रदायिक राजकारणामुळे आपलं काम कमी झाल्याचा दावा त्यांनी केला होता. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली. नंतर कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे सांगत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. हा वाद संपतो न संपतो तोच संगीतकार ए आर रहमान यांच्यावर एक जुनी रचना चोरल्याचा आरोप करण्यात आलाय. पद्मश्री ध्रुपद गायक फैयाज वासिफुद्दीन डागर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानेही ए.आर. रहमान यांनी डागर घराण्याचे शास्त्रीय संगीतातील योगदान पाहता त्यांना श्रेय देण्याचा विचार करावा अशा सूचना केल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 फेब्रुवारीला होणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांच्यावर रचना चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ध्रुपद शैलीचे गायक पद्मश्री फैयाज वासिफुद्दीन डागर यांनी हा आरोप करत ए आर रहमान यांना कोर्टात खेचलं आहे. याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वाची निरीक्षणे नोंदवत काही सूचना केल्या आहेत. या प्रकरणावर आज सुनावणी झाली.
ए आर रहमान यांनी मणिरत्नम यांची 2023 मध्ये रिलीज झालेली तमिळ फिल्म ' पोन्नियिन सेल्वन 2 ' यात वीरा राजा वीरा या गाण्यात डागर कुटुंबाच्या जुन्या रचनांपैकी एक 'शिवस्तुती ' चा काही भाग चोरला आहे. त्यांनी ध्रूपद गायन किंवा संपूर्ण बंदिश गायनावर मालकी असल्याचा दावा केलेला नाही मात्र या गाण्यात वापरण्यात आलेलं एक खास प्रकारची लय ही आमच्या संगीत शैलीत असल्याचं म्हटलं. ही लय सहसा चौतालामध्ये गायली जाते. द्रौपद शैली ही साधारण 800 वर्षांपूर्वी अमीर खुसरो यांनी तयार केलेली होती. शास्त्रीय संगीतातील सर्वात जुनी असणारी ही गायकी आहे. डागर घराण्यात गायले जाणारे ध्रुपद हे सुलतालामध्ये गायलं जातं . असंही त्यांनी म्हटलं . या चित्रपटातील गाणे हे डागर घराण्यातील ध्रुपदावर आधारित असून त्याला श्रेय दिले गेले नाही अशी तक्रार करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं?
मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने म्हटलं ' एखाद्या रचनेचे पहिलं सादरीकरण म्हणजेतूच लेखक ठरत नाही. मात्र डागर घराण्याचे शास्त्रीय संगीतातील योगदान महत्त्वाचे असल्याचेही न्यायालयाने नमूद केलं. न्यायालयाने रहमान यांच्या बाजूच्या वकिलांना उद्देशून सांगितलं की 'हे कलाकार स्पर्धेत नाहीत त्यांना फक्त सन्मान आणि ओळख हवी आहे. त्यामुळे काहीतरी मान्यता देण्याचा विचार करा." दरम्यान रहमान यांचे वकील अभिषेक सिंघवी यांनी यापूर्वीचा सादरीकरण वर कोणतीही हरकत घेतली गेली नव्हती असे नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाने मात्र डागरवाडी परंपरेच्या योगदानावर भर देत म्हटले की या घराण्यांनी शास्त्रीय संगीतात योगदान दिले नसते तर आधुनिक गायकांना हे शक्य झाले असते का ? दरम्यान डागर घराणे हे स्पर्धात्मक क्षेत्रातले नसून त्यांना फक्त सन्मानाने मान्यता हवी आहे . त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
























