Anurag Kashyap On Virat Kohli: टीम इंडियाचा (Team India) स्टार प्लेयर किंग कोहली, म्हणजेच, विराट कोहली (Virat Kohli). जगभरात विराट कोहलीचे अनेक चाहते आहेत. विराट कोहलीचा खेळ, मैदानावर उतरल्यानंतर चित्यासारखा प्रतिस्पर्ध्यावर तुटून पडणाऱ्या विराट कोहलीला पाहणं म्हणजे, चाहत्यांसाठी पर्वणी असते. पण, टीम इंडियाचा महान खेळाडू असणाऱ्या विराट कोहलीवर मी अजिबात बायोपिक बनवणार नाही, असं जर कोणत्या दिग्दर्शकानं म्हटलं तर काय होईल? नक्कीच त्याचे जगभरातले चाहते नाराज होतील. पण, असंच वक्तव्य भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपनं (Anurag Kashyap) केलं आहे.
दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या चर्चेत आहे तो, त्याचा आगामी सिनेमा 'निशांची'मुळे. अनुराग कश्यपनं एकापेक्षा एक असे दर्जेदार सिनेमे देऊन प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच टीम इंडियाची रन मशीन विराट कोहलीवर अनुराग बायोपिक बनवणार का? अशा चर्चांना उधाण आलं होतं. विराट कोहलीचा बायोपिक आणि तो सुद्धा अनुराग कश्यप तयार करणार, अशा चर्चांमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली.
अशातच अनुरागनं मात्र मी विराट कोहलीवर बायोपिक करणार नाही, असं ठामपणे सांगितलं आहे. अनुराग कश्यपच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं काय म्हणाला अनुराग कश्यप? सविस्तर जाणून घेऊयात...
अनुराग कश्यप नेमकं काय म्हणाला?
फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीवर बायोपिक बनवायला तुला आवडेल का? असा प्रश्न दिग्दर्शक अनुराग कश्यपला विचारण्यात आला होता. त्यावेळी अनुराग कश्यपनं हे स्पष्ट केलं की, अनुराग कश्यप भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीवर बायोपिक बनवणार नाही. यामागचं कारण देताना अनुराग म्हणाला की, "विराट कोहली हा आधीच खूप लोकांचा, विशेषतः मुलांचा, आदर्श आहे. मला बायोपिक करायची असेल, तर मी एखादा कठीण विषय निवडेल. आणि एखाद्या अज्ञात व्यक्तीवर बायोपिक करेल. ज्याच्याबद्दल लोकांना माहीत होणं गरजेचं आहे..."
पुढे अनुराग कश्यपनं विराट कोहलीचं कौतुक करताना सांगितलं की, "विराट खूप चांगला व्यक्ती आहे. मी त्याला खूप चांगला ओळखतो. तो खूप प्रामाणिक व्यक्ती आहे. तो खूप इमोशनल असून तो एक अविश्वसनीय व्यक्ती आहे." अशाप्रकारे अनुरागनं विराट कोहलीवर बायोपिक का बनवणार नाही? हे सांगितलंच शिवाय त्याचं कौतुकही केलं.
दरम्यान, अनुरागची निर्मिती असलेला जुगनुमा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. याशिवाय त्याचं दिग्दर्शन असलेला 'निशांची' हा सिनेमा या शुक्रवारी 19 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. अनुरागच्या या सिनेमाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. कारण, या सिनेमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :