Anupamaa actress Jaswir Kaur black magic: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जसवीर कौर आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते. तिनं स्टार प्लसवरील हिट मालिका 'अनुपमा'मध्ये देविकाची भूमिका साकारली आहे. तिनं आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. दरम्यान, पडद्यावरच्या यशाव्यतिरिक्त अभिनेत्रीनं काळ्या जादूबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. या कारणामुळे तिनं सिरिअलमध्ये काम करणं सोडून दिलं असल्याचं म्हटलं आहे. एका मुलाखतीतून तिनं हा धक्कादायक खुलासा केला आहे.
एका खास मुलाखतीत, अभिनेत्रीनं या घटनेबाबत खुलासा केला. तिने दावा केला की, तिच्यावर काळी जादू करण्यात आली होती, ती म्हणाली, 'एक घटना घडली. माझे केस कापून जमिनीत गाडण्यात आले. मला माहित नव्हते, पडद्यामागे काहीतरी भयानक घडत होते. मी विचार करत होते, असं नेमकं का घडतंय?', असं अभिनेत्री म्हणाली.
'दुसऱ्या दिवशी जेव्हा मी केस बांधले, तेव्हा डोक्यावरील एका भागातून केस गायब होते. फक्त केसांची बट नाही तर, केसांचा गुच्छा कापला. काही केस लटकत होते. मी या विषयी कुणाला विचारले नाही. माझा भाऊ कामावर गेला होता. एका महिलेनं त्याला सांगितले की, माझ्या बहिणीचे केस एका विधीसाठी वापरले गेले आहेत. मला याबाबत काहीच माहित नव्हते', असं अभिनेत्री म्हणाली.
जसवीर कौरला सीआयडी सोडावे लागले
सीआयडी मालिकेबद्दल अभिनेत्री म्हणाली, 'जवळजवळ दोन वर्षे उलटून गेली होती. दर शुक्रवारी, दर शनिवारी आम्ही नॉनस्टॉप शूटिंग करत होतो. दररोज आम्ही सलग 31 दिवस शूटिंग करत होतो. क्वचितच मी म्हणायचे की, प्लीज मला एक दिवसाची सुट्टी द्या. अचानक मला ऑफिसमधून सांगितले की, मला हा शो सोडावा लागेल', असा खुलासा अभिनेत्रीनं केला. 'कधी कधी टीम माझ्या शेड्यूलनुसार काम करत होती. दरम्यान, सेटवर देखील काही बदलाव होत असत. हा काळ गोंधळात टाकणारा होता', असंही अभिनेत्रीनं सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
बिग बॉस फेम यूट्यूबरचा कार अपघात, ICUमध्ये उपचार होते सुरु; मॅनेजरकडून हेल्थ अपडेट शेअर
