Anupam Kher Stands For PM Narendra Modi: नीट पेपरफुटी (NEET Paper Leak Case) आणि शिक्षण व्यवस्थेतील (Education System) गैरप्रकार याविरोधात कॉकरोच जनता पार्टीनं (Cockroach Janata Party) आंदोलन छेडत, सर्व विद्यार्थ्यांना सोबत येण्याची हाक दिलेली. हे आंदोलन देशभरात पेटलं, अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळाले. अखेर, 36 ते 37 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं, 25 जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या आंदोलनाला देशभरातून अनेक सेलिब्रिटींनी पाठींबा दर्शवलेला. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही देशाला संबोधित करून, भारताची शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि तिचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी कठोर पावलं उचलली जातील, अशी ग्वाही दिलेली.

Continues below advertisement

तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. अशातच आता बॉलिवूड अभिनेते (Bollywood Actor) अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एक व्हिडीओ शेअर (Anupam Kher Share Video) केला आहे. तसेच, या व्हिडीओमधून अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण केली आहे. त्यांनी लोकशाहीच्या विजयाचं आणि लोकांचा आवाज ऐकला गेल्याचं स्वागत केलंय, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वापरल्या गेलेल्या अति टोकाच्या अश्लील भाषेबाबत, विशेषतः ऑनलाइन व्हायरल झालेल्या विविध व्हिडीओंमध्ये त्यांच्यावर करण्यात आलेल्या अपशब्दांबाबत अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर नेमकं काय म्हणाले? (Anupam Kher Share Video For PM Modi)

Continues below advertisement

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टा हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीची बाजू घेतली आहे. अनुपम खेर व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत की, "आंदोलन आता संपलंय आणि अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत, यातून हे सिद्ध झालंय की, जेव्हा विद्यार्थी प्रामाणिकपणे आपली मतं मांडतात, तेव्हा लोकशाही त्यांची दखल घेते. कदाचित हा संवाद आधीच साधता आला असता आणि तसं झालं असतं, तर परिस्थिती कदाचित या थरापर्यंत पोहोचलीच नसती. पण अखेरीस यावर तोडगा निघाला, आणि हीच लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे..."

अनुपम खेर पुढे बोलताना म्हणाले की, "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, केवळ एका आंदोलनामुळे देश ठप्प होऊ शकत नाही. देशाला भविष्याच्या दिशेनं प्रगती करावी लागेल. मात्र, या संपूर्ण काळात एका गोष्टीनं आम्हा सर्वांना किंवा कदाचित सर्वांना नाही, पण मला तरी नक्कीच खूप दुःखी केलंय. कॅमेऱ्यांसमोर आणि जाहीर मंचावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वापरली गेलेली अपमानजनक आणि अशोभनीय भाषा पाहून मला खूप व्यथित व्हायला झालंय. पुढच्या पिढीसमोर आपल्याला असंच उदाहरण ठेवायचं आहे का? आपण एखाद्या नेत्याशी असहमत असू शकतो किंवा त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो..."

पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर करणं हे आपलं कर्तव्य... : अनुपम खेर 

पुढे बोलताना ते म्हणाले की, "त्यांच्या सर्वच निर्णयांशी सहमत असणं आवश्यक नाही. मात्र तरीही, कोणत्याही निवडून आलेल्या पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं मला वाटतं. विरोध झाला याबद्दल मला दुःख नाही, लोकशाहीत मतभेद असणं स्वाभाविक आहे. मला दुःख या गोष्टीचं वाटतंय की, मतभेद व्यक्त करण्याची भाषा अत्यंत खालच्या पातळीवर गेलीय. आणि हे केवळ तरुणांपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही, तर सर्व वयोगटातील लोकांनी अशा असभ्य भाषेचा वापर केलाय..."

अशा भारताची निर्मिती केली पाहिजे, जिथे मतांमध्ये भिन्नता असेल, पण मनांमध्ये मात्र कोणतंही अंतर नसेल... : अनुपम खेर 

"एक राष्ट्र म्हणून आपण आपली संस्कृती विसरता कामा नये. आपण मतभेद व्यक्त केले पाहिजेत का? नक्कीच. आपण प्रश्न विचारले पाहिजेत का? नक्कीच. आपण सत्ताधाऱ्यांकडून उत्तरांची मागणीही केली पाहिजे. मात्र, आपली भाषा इतकी असभ्य होता कामा नये की, ती आपल्या विचारांआधीच आपल्या व्यक्तिमत्त्वाचं किंवा चारित्र्याचं चुकीचं दर्शन घडवेल. शेवटी, एखाद्या देशाची खरी ओळख केवळ तिथल्या नेत्यांवरून नाही, तर तिथल्या नागरिकांची भाषा आणि आचरण यांवरून ठरते. माझा असा विश्वास आहे की, आपण अशा एका भारताची निर्मिती केली पाहिजे, जिथे मतांमध्ये भिन्नता असू शकेल, पण मनांमध्ये मात्र कोणतेही अंतर नसेल...", असं अनुपम खेर म्हणालेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pearl Maaney Followers Drop Student Protest Controversy: प्रसिद्ध अभिनेत्री विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बरळली, 2 दिवसांत गमावले 3 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स, झाली टीकेची धनी