Sikandar Khers Prank on Anupam Kher Shocks Fans: बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर केवळ त्यांच्या चित्रपटामुळे नाही तर, वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात.  कधी अनुपम खेर यांचे विधान व्हायरल होते. तर, कधी त्यांचा फोटो चर्चेचा विषय ठरतो. दरम्यान, अलिकडेच अनुपम खेर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियात खळबळ उडाली आहे.  या व्हिडिओमध्ये अनुपम खेर सिकंदर खेरसोबत दिसत आहेत.  या व्हायरल व्हिडिओमध्ये सिकंदर खेर याने वडिलांसोबत असे काही केले की,  सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सिकंदर खेरने अनुपम खेर यांच्यासोबत नेमकं काय केले? खेर बाप- लेकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल का होत आहे?  पाहूयात.

सिकंदरने अनुपम खेर यांच्या कानशि‍लात लगावली?

अनुपम खेर सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. व्हिडिओमध्ये सिकंदर शेख त्यांचा मुलगा सिकंदर शेखसोबत दिसत आहे.  व्हिडिओची सुरूवात सिकंदर शेख करतो. तो  सांगतो की, वडिलांचा दात काढण्यात आला आहे.  दोघांमध्ये संवाद होतो. संभाषणादरम्यान, अनुपम म्हणतात की दात काढल्यानंतरही त्यांच्या गालाचा एक भाग अजूनही सुन्न आहे. हे ऐकल्यानंतर  सिकंदरने  विनोदाने, कुणीतरी त्यांच्या कानशि‍लात लगावली असेल, असे म्हणत हसतो.  नंतर तो त्याचा हात वडिलांच्या चेहर्‍याजवळ नेतो.  अनुपम खेर रागाने, तू काय करणार आहेस? असा प्रश्न विचारतात.   'जास्त जोरात मला लागलं ना, तर मी माझ्या डाव्या हाताने तुला मारेन.. तुझा नाक तोडून टाकेन..', अनुपम खेरच्या इशाऱ्याला न जुमानता सिकंदर खेरने विनोदाने त्याच्या वडिलांच्या गालावर हलकेच मारले.  यानंतर त्यांना धक्का बसला. 

खेर बाप - लेकाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

 

 जेव्हा सिकंदरने पुन्हा त्याच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला,  तेव्हा अनुपम खेर यांनी त्याला फिल्मी शैलीत उत्तर दिले.  खेर बाप लेकाने हा व्हिडिओ घरातच शूट केला आहे. यात  केवळ अनुपम खेर दिसत आहेत. तर, कॅमेऱ्याच्या मागे त्यांचा मुलगा सिकंदर दिसत आहे.

सध्या खेर बाप लेकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   सर्वांनाच बाप लेकामधील मजेशीर क्षण नेटकऱ्यांना आवडला आहे.  नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.