Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: गेल्या अनेक वर्षांपासून 'क्राइम पेट्रोल'चे सूत्रसंचालन करणारे अनुप सोनी (Anup Soni) यांच्याऐवजी सोनी टीव्हीने यंदाचं क्राइम पेट्रोल होस्ट करण्याची धुरा अभिनेता अजय देवगणवर (Ajay Devgan) सोपवली. TRP च्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सोनी टीव्हीने लोकप्रिय प्राधान्य दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, अनुप सोनी यांच्या जागी आता क्राइम पेट्रोल या नव्या सीजनच सूत्रसंचालन अजय देवगण करणार असल्याचं समोर येताच अभिनेते अनुप सोनी यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिलीय..
अनुप सोनींची पहिली प्रतिक्रिया...
'क्राइम पेट्रोल' शोची सुरुवात 2010 मध्ये झाली होती. तब्बल नऊ वर्ष अनुप सोनी या शोचं सूत्रसंचालन करत होते. मात्र, आता यंदाच्या सीजनच सूत्रसंचालन चॅनलच्या निर्मात्यांनी अजय देवगण यांना दिलं आहे. अजय देवगणच्या एन्ट्रीवर अनुप सोनी म्हणाले," मला या विषयावर जास्त बोलायचं नाही. यशो सोबत गेली अनेक वर्ष माझा प्रवास राहिला आहे.हा प्रवास खूप खास आहे.या काळात प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ' असं अनुप सोनी म्हणाले.
अजय देवगणविषयी बोलताना ते म्हणाले 'मी अजय देवगन चा मोठा चाहता आहे.त्यांच्यासोबत प्रकाश झा यांच्या गंगाजल आणि अपहरण या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.मला पूर्ण विश्वास आहे की या शोमध्ये ते त्यांची वेगळी शैली घेऊन येतील.नवीन सीझनसाठी शोच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो.' असं अनुप सोनी म्हणाले..
मिळालेल्या माहितीनुसार क्राइम पेट्रोलच्या नव्या सीजनच शूटिंग सुरू झालं असून 15 भागांचं शूटिंग पूर्ण झालं आहे. मोठ्या पडद्यावरून पहिल्यांदाच अजय देवगण टीव्हीवर होस्ट म्हणून दिसणार आहे. अभिनेते अनुप सोनी यांच्या क्राइम पेट्रोल मधील खास शैलीमुळे हा शो प्रचंड लोकप्रिय झाला होता. याव्यतिरिक्त त्यांनी बालिका वधू या मालिकेतूनही विशेष ओळख मिळवली होती.
