Anshuman Vichare On Maharashtrachi Hasyajatra Show: सूंपर्ण महाराष्ट्राला (Maharashtra News) खळखळून हसवणारा शो म्हणजे, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra). या शोमधून घराघरांत पोहोचलेला मराठमोळा अभिनेता (Marathi Actor) अंशुमन विचारे (Anshuman Vichare) नेहमीच चर्चेत असतो. तो त्याचे वेगवेगळे अनुभव, व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत असतो. हास्यजत्रेतून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या अंशुमन विचारेनं कोरोना लॉकडाऊनमध्ये (Corona Lockdown) अचानक हा शो सोडला. त्यावेळी चाहत्यांना जोरदार धक्का बसलेला. अंशुमननं अशा तडकाफडकी निर्णय का घेतला? नेमकं त्याच्यासोबत काय झालेलं? याचा त्याला नेम लागेना. अशातच, आता कित्येक वर्षांनी त्यावेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra Show) सोडण्याचं खरं कारण सांगितलं आहे. तसेच, त्यानंतर फारसा कुठेच न दिसलेल्या अंशुमन विचारेनं तिसरं घर कसं घेतलं? असा प्रश्नही चर्चेत होता. त्याबद्दलही अभिनेत्यानं खुलासा केला आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता अंशुमन विचारे यानं नुकतीच 'इट्स मज्जा' युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी त्यानं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम का सोडला? याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना काळात त्यानं हा निर्णय का घेतला? याबाबत त्यानं सर्वकाही सांगितलं आहे.
अभिनेता अंशुमन विचारे नेमकं काय म्हणाला? (Anshuman Vichare On Maharashtrachi Hasyajatra)
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अंशुमन विचारे म्हणाला की, "माझं पहिलं घर होतं काजूपाड्यात जे माझ्या वडिलांच होतं. त्यानंतर मी स्वत:च्या पैशाने गोराईत माझं पहिलं घर घेतलं. सीवडूच्या मागे होतं ते. त्यावेळी माझं सगळं छान चालेलं. इव्हेंट्स वगैरे चालू होते त्यामुळे पैसेही भरपूर मिळत होते. त्या पैशाने मी पुण्यात पिंपरी चिंचवड इथल्या सांगवी येथे दुसरं घर घेतलं. तो मोठा फ्लॅट होता. मग करोना सुरू झाला. त्यावेळी आमचं बबनचं शूट चालू झालं होतं. मी फॅमिली सोडून जाणार नव्हतो. तेव्हा माझ्या मनात कुठेतरी जाणीव झाली की आपण जे काही स्किट वगैरे करतोय, रिअलिटी शो करतोय त्यावरुन एक्सपायरी डेटकडे येत चाललो आहोत. आपल्याकडून तेच तेच काम होतय. मला थांबायला हवं असा विचार करुन मी ब्रेक घेतला."
"...माझी आता ना एक्सपायरी डेट जवळ आली"
"दुसरी गोष्ट मला असं वाटायला लागलं होतं, माझी आता ना एक्सपायरी डेट जवळ आली आहे. ज्या स्किट्स करतोय आपण, ज्या रिऍलिटी शोमध्ये काम करतोय आपण, तेच तेच करतोय आपण. मग मी ब्रेक घेतला. पण हे क्रेडिट मी माझ्या बायकोला देईन, कारण मी म्हटलं तिला "मी ब्रेक घेतोय, कोरोना आहे, पुढचं कसं काय ? हफ्ते द्यायचे आहेत, आपल्याला नव्या घराचे..." त्यावेळी 48000 रुपये हफ्ता होता नव्या घराचा. ती म्हणाली, "काही हरकत नाही. तुला नाही करायचं आहे ना. आपण आमटी भात खाऊ, खिचडी खाऊ मस्त. काही प्रॉब्लेम नाही. तू काम कर मस्त..." मी तेव्हा सगळा वेळ माझ्या मुलीला दिला. तेव्हा ती एक दीड वर्षाची होती...", असं अंशुमन विचारे म्हणाला.
पुढे बोलताना अंशुमन विचारे म्हणाला की, "पण नंतर असं झालं की, मी एक दीड वर्ष काहीच काम करत नव्हतो. छोटं मोठं तरी काहीतरी करायचो. करोनामध्ये क्वारंटाइन शूट केलं. मात्र त्यामुळे माझ्या हप्त्याची गणित बिघडायला लागली. त्यामुळे जबरदस्ती ते पुण्याचं घर विकावं लागलं. ते घर विकल्याचं मला खूप वाईट वाटलं, कारण खूप छान घर बनवलेलं ते. पुढे करोना संपल्यावर 2 वर्षांनी मी ठाण्याला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. ठाण्याचं कल्चर, तिथलं वातावरण मला खूप आवडतं... त्यामुळे मग गोराईचं घर काढून मी हे घर घेतलं. असं हे माझं तिसरं घर आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP Majha च्या बातम्या LIVE:
