Ankita Walawalkar Post On Air India: गुजरात अहमदाबादमधील (Gujarat Ahmedabad Plane Crash) विमान दुर्घटनेनं सर्वांना हादरवलं. अहमदाबाद विमान अपघातात (Ahmedabad Plane Accident) 265 जणांचा मृत्यू झालाय. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे (Ahmedabad-London) उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे. दरम्यान, ही दुर्घटना विमानातल्या तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स (Black Box of Crashed Plane) सापडला असून विश्लेषणासाठी तो दिल्लीला पाठवण्यात आलाय.

अहमदाबाद दुर्घटनेनं अख्खा देश हळहळला. अनेकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर, अनेक सेलिब्रिटींनीही यावर आपल्या दुःखद प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल आणि बिग बॉस मराठी सीझन 5 ची स्पर्धक अंकिता प्रभू वालावलकर हिनं केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच अंकिता आपल्या नवऱ्यासह युरोप ट्रिपला गेली होती. त्यावेळी युरोपला जाताना तिनं एअर इंडियाच्या विमानातून प्रवास केलेला. तब्बल 9 तासांच्या प्रवासात तिला फारच हादरवणारा अनुभव आला. याच संदर्भात अंकितानं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसेच, तिनं एअर इंडियाच्या प्लेनमधले काही फोटोही शेअर केलेत. त्यासोबतच विमानांची अशाप्रकारे वाईट देखभाल करून ते लोकांचे जीव धोक्यात का घालत आहेत? असा सवालही अंकिता वालावलकरनं उपस्थित केला आहे. 

काय म्हणाली अंकिता वालावलकर?

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये अंकितानं लिहिलंय की, "काही दिवसांपूर्वीच मी एअर इंडियाच्या विमानानं प्रवास केला. तिथे एसी व्यवस्थित काम करत नव्हता, याशिवाय टीव्ही स्क्रीनची अवस्थासुद्धा अतिशय वाईट होती आणि जेवणाबद्दल तर मला काही बोलायचंच नाही... नऊ तासांचा विमान प्रवास आम्ही अशा परिस्थितीत केला. विमानांची अशाप्रकारे वाईट देखभाल करून ते लोकांचे जीव धोक्यात का घालत आहेत?"

दरम्यान, पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादेतील दुर्घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावर 20 मिनिटं पंतप्रधानांनी पाहणी केलीय. तसेच, त्यांनी अपघाताची कारणं, झालेलं नुकसानाची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना त्यासंदर्भात सूचनाही दिल्या आहेत. अपघातस्थळावरून पंतप्रधानांनी रूग्णालयात भेट दिली. इथे पंतप्रधानांनी अपघातातील जखमींची विचारपूस केली आहे. रूग्णालयात पंतप्रधान मोदी 10 मिनिटं उपस्थित होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chetan Bhagat On Ahmedabad Air India Plane Crash: टेकऑफ केल्यानंतर लगेचच असं कसं घडू शकतं? चेतन भगत यांच्याकडून शंका व्यक्त, तब्बल तीन ट्वीट करत म्हणाले...