Ankita Walawalkar On CM Devendra Fadnavis: बिग बॉस मराठी फेम (Bigg Boss Marathi) आणि कोकण हार्टेड गर्ल (Kokan Hearted Girl) फेम इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) ही आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिला विशेष ओळख बिग बॉस मराठी सिझन 5 (Bigg Boss Marathi Season 5) मधून मिळाली. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात तिनं लग्नगाठ बांधली. अंकिताने संगीतकार कुणाल भगतसोबत (Kunal Bhagat) विवाह केला होता. दोघांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झालेली. अंकिता आता कुणालसोबतचेही अनेक रिल्स शेअर करत असते. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमासाठी अंकितानं आपला पती कुणाल भगतसोबत हजेरी लावली होती. अंकिता नेहमीच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्यक्त होत असते. अशातच आता अंकितानं एका मुलाखतीत बोलताना महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. मुलाखतीत बोलताना महाराष्ट्राच्या नेत्यांमधील खरा बिग बॉस कोण? असं अंकिता वालावलकरला विचारण्यात आलं. त्यावेळी तिनं दिलेल्या उत्तरानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अंकिता वालावलकर काय म्हणाली?
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरनं तिच्या नवऱ्यासोबत नुकतीच लोकमत वृत्तसमुहाच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इअर या कार्यक्रमाला हजेरी लावलेली. यादरम्यान अंकिताला 'तुझ्या मते महाराष्ट्राच्या नेत्यांमधील खरा बिग बॉस कोण?', असं विचारलं. त्यावर अंकिता वालावलकरनं अनेक मराठी माणसांच्या मनातलं उत्तर दिलं.
अंकिता वालावलकर म्हणाली की, "नेतृत्व, निर्णयक्षमता आणि मार्गदर्शक याला तीन बाबींचा विचार केला तर, मला वाटतं बिग बॉस हे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील..." पुढे बोलताना, "आपण आपल्या कुटुंबात मराठी भाषा जपली पाहिजे आणि सगळ्यांचा भाषांचा आदर करून आपण आपली भाषा टिकवली पाहिजे...", असं म्हणत अंकितानं मराठी भाषेबाबतची तळमळ व्यक्त केली.
स्वतःच्या बोलीभाषेबाबत बोलताना अंकिता वालावलकर म्हणाली की, "तशा महाराष्ट्रात खूप बोली भाषा आहेत. आता बिग बॉसमध्येच आपण वेगळी भाषा बघितली, जी मलाही नवीन होती. तशीच मालवणी भाषा आहे. या सगळ्या बोली भाषा ज्या आहेत, त्या मराठीच्या उपभाषा आहेत. त्यामुळे कुठे पाहते, असं नाही म्हणता येणार... पण, आपल्याकडे विविधता आहे भाषांमध्येसुद्धा आणि त्यामुळे प्रत्येक भाषा जपत-जपत आपण मराठी भाषा जपली तर..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
