Ankita walawalkar on Nasrapur Crime: पुण्यातील नसरापूर भागात अंगावर काटा आणणारी घटना घडली. 65 वर्षीय नराधमाने अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. या घटनेनंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात या घटनेने संतापाची भावना आहे . सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय. अनेक कलाकारांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. अशातच सोशल मिडियावर बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. क्रूर आणि विकृत मानसिकतेवरही ती बोललीय. अंकिताने एक व्हिडिओ शेअर करत या विषयावर आपलं मत मांडलय. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.आपण फक्त न्याय मागतोय, पण तो मिळतोय कुठेय? असं सवाल तिने केलाय. (Pune Nasrapur Bhor Crime)
काय म्हणाली अंकिता वालावलकर? (Ankita Walawalkar)
बिग बॉस फेम अभिनेत्री अंकिता वालावलकर म्हणाली, "काल पुण्यात काय झालं हे सगळ्यांनाच कळलं असेल. एक धक्कादायक घटना घडली.यात साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरती 65 वर्षांच्या म्हाताऱ्याने अत्याचार केला, नंतर तिचा खून केला. ही घटना अतिशय गंभीर आहे. आणि ही काही महाराष्ट्रात घडणारी पहिली घटना नाही. अशा घटना वारंवार घडतायेत. महाराष्ट्रात पूर्वी असं काही घडायचं, महाराजांच्या काळात.. तेव्हा महाराज त्यांची हात छाटून टाकायचे. कारण ही वृत्ती छाटणं गरजेचं आहे. आणि आपण काय करतोय? अशी एखादी घटना घडली की आपण निषेध व्यक्त करतोय, मोर्चे काढतोय. आणि न्याय मागतोय. न्याय काही आपल्याला मिळत नाही . "
ती पुढे म्हणाली " यात मला सरकारला आणि विरोधी पक्षांनासुद्धा मला एकच विनंती करायची आहे. कोणत्याही गोष्टींमध्ये आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर एक ठोस कायदा येणे गरजेचे आहे. आपल्याकडे आत्ताही कायदे आहेत, पण त्या कायद्याच्या पळवाटाही आहेत. या पळवटांमुळेच अशा गोष्टी घडताना दिसतात. जेवढं मला कळलं, त्यावरून ती व्यक्ती अशीच गुन्हा करून बाहेर आली होती. तिला सूट दिली गेलेली होती. चूक झाली असेल तर पेरोलवर सोडतात.अशाच गोष्टींमुळे ती व्यक्ती बाहेर होती. त्यामुळे त्या व्यक्तीकडून असाच एक गंभीर गुन्हा घडला.तीन वर्षांची चिमुरडी जिने जग बघितलंच नव्हतं,अशा घाणेरड्या कृत्यांमध्ये तिचा मृत्यू झाला. विचार करा, आज तिच्या आई-वडिलांना काय वाटत असेल.आपण विचारही करू शकत नाही, एवढा त्रास त्यांना होतोय. हा ठोस कायदा येणं फार गरजेचं आहे.कायद्यामुळे एक भीती निर्माण होईल आणि अशी कृत्य होणं थांबतील. नाहीतर अशी कृत्य वारंवार होत राहणार. आम्ही मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर येणार. मोर्चे काढणार आम्ही लोकांना सांगणार हे चुकीचं होतंय.परत काही दिवसानंतर अशीच एखादी छोटी मुलगी मोठी मुलगी स्त्री कुणीतरी या अशा गोष्टींना बळी पडत राहणार. असं अंकिता म्हणाली.
'त्याला जेलमध्ये पोसत बसू नका ...'
अंकिता म्हणाली, "मी एक मुलगी म्हणून एक स्त्री म्हणून सगळ्यांच्या वतीने एकच विनंती करते.एक ठोस कायदा आम्हाला हवाय . आरक्षणा मला द्याच. आरक्षण ही आम्हाला हवंय. त्याचबरोबर अशा गुन्ह्यांसाठी एक गंभीर कायदा हवा. ज्यामुळे लोक थरथर कापतील .आणि असे प्रकार पुन्हा होणार नाहीत .हे आम्हाला अपेक्षित आहे की हा कायदा लवकर यावा .तू जो कोणी व्यक्ती आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी .65 वर्षांचा आहे, वयाचा मान वगैरे सांगून त्याला जेलमध्ये पोसत बसू नका. महाराजांच्या काळात जे शक्य होतं, तसे हात छाटण तुम्हाला शक्य असेल तर ही वृत्ती छाटण्यासाठी प्रयत्न करा .आम्ही सगळेजण त्या दिवसाची वाट बघतोय तो दिवस लवकर येईल.जय हिंद जय महाराष्ट्र. "
