Anirudh Ravichander and Kavya Maran: एकीकडे 'जेलर 2' (Jailer 2) या सिनेमाची चर्चा सुरू आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालत आहे. अशातच संगीतकार अनिरुद्ध रविचंदर (Anirudh Ravichander) आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. अनिरुद्ध रविचंदर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. IPL टीम 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकिन काव्या मारनसोबत (Kavya Maran) लग्न (Wedding) करणार असल्याची माहिती आहे. बऱ्याच दिवसांपासून याची चर्चा सुरू आहे. नोव्हेंबर 2026 रोजी लग्न करणार असल्याची माहिती आहे. 11 नोव्हेंबरला ग्रीसमध्ये हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. तर, 11 नोव्हेंबरला वेडिंग रिसेप्शन पार पडणार, अशी माहिती आहे. दरम्यान, दोघांकडून अद्याप लग्न आणि रिसेप्शनबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
वलई पेच्चु यांच्या रिपोर्टनुसार, अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन या दोघांचं लग्न 11 नोव्हेंबर रोजी पार पडणार, अशी माहिती आहे. ग्रीसमध्ये दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे, अशी चर्चा आहे. तर, चेन्नईमध्ये 11 नोव्हेंबर रोजी वेडिंग रिसेप्शन पार पडणार आहे, अशी बातमी आहे. आता असं म्हटलं जात आहे की, 21 नोव्हेंबरला वेडिंग रिसेप्शन होणार आहे. हे वेडिंग रिसेप्शन फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. तेलंगणा सीएमओने एक फोटो शेअर केला आहे. रिपोर्टनुसार, काव्या मारन आणि अनिरुद्ध यांचे वेडिंग रिसेप्शन 21 नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे पार पडणार आहे.
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्यातील वयात अंतर किती? (Anirudh Ravichander and Kavya Maran Wedding Age Difference)
6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नई येथे काव्या मारनचा जन्म झाला. चेअरमन कलानिधी मारनची काव्या मुलगी आहे. काव्या मारनच्या आईचं नाव कावेरी मारन असे आहे. काव्या मारनने चेन्नईतील स्टेला मॅरिस कॉलेजमधून कॉमर्सची डिग्री घेतली. तर, वारविक बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले. तिचे वडील सनराइजर्स हैदराबादचे को-ओनर आहेत. काव्या मारन आयपीएलमधील सुप्रसिद्ध चेहरा आहे. तिचा नेटवर्थ साधारण 409 कोटी इतका आहे. तर, अनिरुद्ध रविचंदर याचा नेटवर्थ 50 कोटी इतका आहे. दोघांच्या वयाच्या अंतरबद्दल बोलायचं झाल्यास, काव्या मारन सध्या 34 वर्षांची आहे. तर, अनिरुद्ध रविचंदर याचा जन्म 16 ऑक्टोबर 1990 रोजी झाला. अनिरुद्ध रविचंदर 36 वर्षांचा आहे. दोघांमध्ये 2 वर्षांचा अंतर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
