Anil Kapoor Dhurandhar 2 Offer: रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2: द रिवेंज’ या चित्रपटाबद्दल सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अनिल कपूरही दिसणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र स्वतः अनिल कपूरने या अफवांवर भाष्य करत चित्रपटातील ऑफर का नाकारली, यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना अनिल कपूरने सांगितलं की दिग्दर्शक आदित्य धरने त्यांना ‘धुरंधर 2: द रिवेंज’मध्ये छोट्या कॅमिओसाठी संपर्क केला होता. (Aditya Dhar) अनिल कपूर म्हणाला, “आदित्य माझ्याकडे ‘धुरंधर 2’साठी आले होते. त्यांना माझ्याकडून चित्रपटात छोटा कॅमिओ करायचा होता.” या कार्यक्रमात जवळपास चार दशकांपासून हिंदी सिनेसृष्टीत सुपरस्टार म्हणून आपली छाप ठेवणाऱ्या अनिल कपूर यांनी ऑफर नाकारावी लागण्याचे कारणही सांगितलं. (Dhurandhar 2)

Continues below advertisement

Anil Kapoor:‘हा माझाच नुकसान आहे’

"आदित्य माझ्याकडे ‘धुरंधर 2’साठी आले होते. त्यांना माझ्याकडून चित्रपटात छोटा कॅमिओ करायचा होता. मात्र त्याच काळात दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग आधीच ठरलेलं असल्यामुळे त्यांना हा ऑफर नाकारावा लागला. अनिल म्हणाला, “मी आज जिथे आहे ते माझ्या प्रोफेशनलिझम आणि कमिटमेंटमुळे. त्या तारखा आधीच दुसऱ्या फिल्ममेकरसाठी बुक होत्या. मी आदित्यला सांगितलं की मला हा कॅमिओ करायला आवडलं असतं, पण त्या दिवशी मी आधीच कमिटेड आहे.”

अनिल कपूरने पुढे सांगितलं की हा ऑफर नाकारण्याचा निर्णय त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो. तो म्हणाला, “ही एक शानदार फिल्म आहे आणि ती न करणं हे माझंच नुकसान आहे. पण कमिटमेंट मोडून दुसऱ्या फिल्मसाठी जाणं पूर्णपणे अनप्रोफेशनल ठरलं असतं. म्हणून मी तो निर्णय घेतला. आशा आहे की भविष्यात आम्ही एकत्र काम करू.”

Continues below advertisement

‘धुरंधर 2’ला प्रचंड प्रतिसाद 

दरम्यान,‘धुरंधर 2: द रिवेंज’बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. माहितीनुसार या चित्रपटाचा रनटाइम जवळपास 3 तास 55 मिनिटे असणार आहे, त्यामुळे अलीकडच्या काळातील सर्वात लांब हिंदी चित्रपटांपैकी तो एक ठरणार आहे. पहिल्या भागाने जगभरात तब्बल 1350 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. त्यामुळे या सिक्वेलकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. ‘धुरंधर 2’ 19 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा:

'बिग बॉस' फेम अभिनेता विकतोय गॅस? म्हणे, 'बॉलिवूडपेक्षाही जास्त पैसा'; एका सिलेंडरची किंमत ऐकून येईल चक्कर