मुंबई : अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titiksha Tawde) आणि सिद्धार्थ बोडके (Sidharth Bodke) यांनी नुकतच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. तितिक्षाने त्यांच्या केळवणाचे फोटो शेअर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं. तसेच भगरे गुरुजींची लेक आणि अभिनेत्री अनघा अतुल हीने देखील सिद्धर्थ आणि तितिक्षाचं केळवण केलं आहे. तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन तिने या दोघांच्या केळवणाचे फोटो शेअर केलेत. तितिक्षा तावडे  (Titeeksha Tawade) आणि दृश्यम 2 अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) यांचा विवाह लवकरच पार पडणार आहे. याबाबतची माहिती तितिक्षा आणि सिद्धार्थ दोघांनीही इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टच्या माध्यमातून दिली. 


तितिक्षा आणि सिद्धार्थ हे दोघेही झी युवा वाहिनीवरील तु अशी जवळी रहा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं. या रिल लाईफ जोडप्याने खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांचा जोडीदार म्हणून स्विकार केला आहे. सध्या त्यांच्या केळवणाचा थाट सगळीकडे पाहायला मिळतोय. 


तितिक्षा आणि सिद्धार्थच्या अभिनयाचा प्रवास


तितिक्षा आणि सिद्धार्थ यांनी झी युवा वाहिनीवरील तु अशी जवळी रहा या मालिकेत मनवा आणि राजवीरची भूमिका साकारली होती. त्यानंतर सिद्धार्थ अजय देवगनसोबत दृश्यम 2 या चित्रपटात काम केलं होतं. तसेच तो आता श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तितिक्षा सध्या झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करत आहे. 


तितिक्षा 'शाबास मिथू' सिनेमातून आली होती प्रेक्षकांच्या भेटीला


अभिनेत्री तितिक्षा यापूर्वी 'शाबास मिथू' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. शाबास मिथू हा सिनेमा भारतीय क्रिकेटर मिथाली राज हिच्या आयुष्यावर आधारित होता. या सिनेमात तापसी पन्नूची प्रमुख भूमिका होती. शिवाय तितिक्षानेही महत्वाची भूमिका बजावली होती. तर सिद्धार्थ बोडके याने अजय देवगणच्या 'दृश्यम 2'मध्ये सिद्धार्थ बोडकेने डेव्हिडची भूमिका साकारली होती. या शिवाय अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या श्री देवी प्रसन्न या सिनेमातही सिद्धार्थ झळकणार आहे. मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणारे तितिक्षा आणि सिद्धार्थ लवकरच वैवाहिक आयुष्याला सुरुवात करणार आहेत. 


ही बातमी वाचा : 


Titeeksha Tawade and Siddharth Bodke : 'मी सिद्धार्थला एक निरोप देईन', असा आहे लग्नाआधीच्या 'व्हॅलेंटाईन्स डे'ला तितिक्षाचा प्लॅन