Amruta Subhash : अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) ही तिच्या सिनेमांमुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तिच्या चित्रपटांमुळे आणि अभिनयामुळे अमृता बरीच चर्चेत असते. अमृता ही खऱ्या अर्थाने चर्चेत आली ते तिच्या 'सॅक्रेड गेम्स' (Sacred Games) या वेब सिरिजमुळे. या सिरिजमध्ये अमृताने कुसुम देवी ही भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका  प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडली. अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी या सिरिजचं दिग्दर्शन केलं आहे. या सिरिजमध्ये इंटिमेट सीन्स करताना कोणते अनुभव आले याविषयी अमृताने नुकतच सौमित्र पोटेच्या मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये भाष्य केलं आहे. 


मराठीसह अमृताने हिंदी आणि ओटीटी माध्यमांवरही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिच्या इंटिमेट सीन्समुळे ती बरीच चर्चेत आली होती. तिच्या आयुष्यातील पहिल्या इंटिमेट सीनविषयी आणि तेव्हा तिचा नवरा संदेश कुलकर्णी याला तिने केलेल्या फोन कॉलविषयीचे अनुभव सांगितले आहे. तसेच दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव यावेळी अमृताने शेअर केला. नुकतीच तिची  'लस्ट स्टोरीज 2' (Lust Stories 2) ही सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.


दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव


अनुरागने जेव्हा माझा या भूमिकेसाठी विचार केला तेव्हा त्याने म्हटलं होतं की, ही गोष्ट अमृताला मी सर्वात आधी सांगणार. त्यानंतर मला सांगितलं की अमृता असा असा रोल आहे, इंटिमेट सीन्स आहेत. मी त्याला म्हटलं अनुराग इंटिमेट सीन्स... तेव्हा अनुरागने मला म्हटलं की, अमृता मी आहे. स्री दिग्दर्शिकांबरोबर काम करताना जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचं काम करायचं असतं तेव्हा नक्कीच तुम्हाला कम्फर्टटेबल वाटतं. पण या माणसाने एक स्त्री म्हणून माझी वर्ननॅबिलिटी त्यावेळी समजून घेतली. 


माझ्या 'या' गोष्टींचा देखील विचार केला गेला - अमृता सुभाष


या मुलाखतीदरम्यान अमृताने या सिरिज दरम्यानचा एक अनुभव शेअर केला आहे. तिने म्हटलं की, इंटीमेट सिन्स करताना त्या दिवशी माझी मासिक पाळी होती तेव्हा तो त्याच्या संपूर्ण टीमला ओरडला होता. तुम्ही अॅक्ट्रेसला हे विचारायला हवं, तिच्या अशा दिवसांमध्ये तिला हा सीन कसा काय करावासा वाटेल. ती हा सीन कसा करणार. त्यानंतर जेव्हा शेड्युल्ड लागायचं तेव्हा माझी मासिक पाळीची तारीख विचारली जायची. 


या गोष्टीसाठी संदेशने दिलेली साथ


माझ्या आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा इंटिमेस सीन करण्याची वेळ आली तेव्हा मी पहिला फोन हा संदेशला केला. माझा पहिला सिनेमा मिथुन यांचा मिमो चक्रवर्तीसोबत होता. तो सिनेमा आला नाही. मला स्मुचिंगचा सीन करायला लावला होता. तोपर्यंत मराठीतही असे सीन होत होते. पण माझी ते करण्याची पहिली वेळ होती. मी तिथूनच संदेशला फोन केला. संदेश असा सीन आहे. त्यावेळी त्याने मला सांगितलं, अमृता अजिबात लाजू नकोस. कारण जे काही लाजून करशील ते स्क्रीनवर फार वाईट दिसेल. ते तू मनापासून आणि व्यवस्थित कर. जे तू खरं करशील ते सुंदरच दिसेल. अवघडून केलंस तर ते वाईटच दिसेल. ती भावना आहे एक. तू जर रडायचे सीन करतेस तर या भावनेला तू वेगळं का ट्रीट करायचं. 


ही बातमी वाचा : 


Ideas Of India 2024: चित्रपट चालला नाही याचं दु:ख आहेच पण..., लाल सिंह चड्ढाच्या अपयशानंतर काय होती आमिर खानची प्रतिक्रिया?