Amruta Khanvilkar Sonalee Kulkarni Catfight Controversy: सिनेसृष्टीत (Film Industry) जेवढी ग्लॅमरस आहे, तेवढी इथे चढाओढ आणि चुरस रंगल्याचं पाहायला मिळतं. बॉलिवूड (Bollywood News) असो, हॉलिवूड (Hollywood News) असो किंवा मग आपली मराठी सिनेसृष्टी (Marathi Film Industry)... सगळीकडेच हिरोईन्समधली कॅटफाईट (Marathi Actress Catfight) चर्चेचा विषय ठरते. दोन हिरॉइन्मधली धुसफूस आणि त्यांच्यातली स्पर्धा, या गोष्टी मसालेदार करुन अगदी रंजकपणे सांगून चर्चा उठवल्या जातात. अशाच चर्चा काही वर्षांपूर्वी मराठी सिनेसृष्टीतल्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींबाबत रंगल्याचं पाहायला मिळालेलं. पण, आता दोन आघाडीच्या मराठीतल्या अभिनेत्रींच्या कॅटफाईटबाबतचा गैरसमज दूर होत असल्याचं पाहायला मिळतंय. दोन यशस्वी अभिनेत्री कधीच चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत, असा समज अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. पण, आता या अभिनेत्रींनीच स्वतः कॅटफाईटवर भाष्य करुन सर्व गैरसमज दूर केले आहेत. 

काही दिवसांपूर्वी झालेल्या 'फिल्मफेअर राउंड टेबल'मध्ये मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat), सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सहभागी झालेल्या. यावेळी त्यांनी इंडस्ट्रीतील मैत्री, स्पर्धा आणि गैरसमज याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अनेक वर्षांपासून मराठी फिल्म इंडस्ट्रीची 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी आणि 'चंद्रा' अमृता खानविलकर यांच्यातल्या कॅटफाईटच्या चर्चा रंगायच्या. पण, राउंड टेबलमध्ये बोलताना दोघींनीही सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच, त्यांच्या नात्यात कधीच कोणतंही वैर किंवा भांडण नव्हतं. इंडस्ट्रीत अनेकदा अभिनेत्रींबाबत अनावश्यक अफवा पसरवल्या जातात, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते, असं म्हटलंय. 

कॅटफाईटवर काय म्हणाल्या अमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी? (Amruta Khanvilkar, Sonalee Kulkarni Catfight)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली की, "इंडस्ट्रीत सर्वात जास्त बोललं जायचं किंवा चर्चा होती ती म्हणजे... अमृता आणि माझ्यात असलेलं वैर...! पण, आज मी सांगते असं काहीच नव्हतं. बरं ही आमच्यात असलेल्या वादाची चर्चा कोणत्याही मीडियाने किंवा प्रसारमाध्यमांनी क्रिएट केली नव्हती. तेव्हा सोशल मीडिया इतकं जास्त कोणी वापरतही नव्हतं. याउलट, आमच्या दोघींमधलं वैरत्व हे इंडस्ट्रीमधल्या पुरुष अभिनेत्यांनी तयार केलं होतं. हे मी आज फार स्पष्टपणेच सांगते. कारण, आम्हा दोघींची अशी प्रत्यक्ष खरंच कधीही भांडणं झाली नव्हती किंवा वादही नव्हता..."

अमृता खानविलकर याबद्दल बोलताना म्हणाली की, "मी तुम्हाला एक किस्सा सांगते, मी आणि सोनाली एकदा एकत्र विमानप्रवास करत होतो. आम्ही दोघी एकमेकींच्या बाजूला बसलो होतो. कारण, आम्हाला त्याच जागा निवडून दिल्या होत्या. तेव्हा काही पुरुष अभिनेत्यांनी आमच्या दोघींचे एकत्र फोटो काढले होते. मी आता कोणाचं नाव घेणार नाही. पण, तेव्हापासून ही सगळी चर्चा सुरू झाली. आता पुढे काय होणार? या दोघी एकच रूम शेअर करणार का? एकाच रंगमंचावर परफॉर्म करणार का? आमच्या दोघींच्या मैत्रीबद्दल चर्चा सुरू झाली आणि सगळ्यांमध्ये आमच्या मैत्रीविषयी उत्सुकता निर्माण झाली होती."

सोनाली कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाली, "यामागचं अजून एक कारण म्हणजे, आम्ही दोघींनी एकाच सिनेमात दोन वेगवेगळ्या गाजलेल्या गाण्यांवर सादरीकरण केलेलं... त्या चित्रपटाचं नाव, 'नटरंग'. तेव्हापासून या वैरत्वाच्या चर्चा सुरू झाल्या... त्यामुळे आमच्यासाठीही हे विचित्र होतं, हे वादाचं चित्र मीडियानं नाहीतर इंडस्ट्रीनंच तयार केलेलं होतं..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amruta Khanvilkar Vajale Ki Bara Song: ''वाजले की बारा'साठी मी पहिली पसंती नव्हते...'; अमृता खानविलकरचा खुलासा, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

ABP माझाच्या बातम्या LIVE...