Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि तिचा पती अभिनेता हिमांशु मल्होत्रा (Himmanshoo Malhotra) यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठं वादळ उठलेलं. दोघांच्याही घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलेलं. तसेच, अमृता आणि हिमांशु दीड वर्षांपासून वेगळे राहत असल्याचे दावे करणाऱ्या पोस्टही व्हायरल झालेल्या. त्यामुळे सोशल मीडियावर आणि दोघांच्याही चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ उडालेला. अफवा उठल्यानंतर सेलिब्रिटी कपलनं (Celebrity Couple) आम्ही अजूनही एकत्र आहोत, असं स्पष्टीकरणंही दिलेलं. पण, त्यानंतरही सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा सुरूच होत्या. अखेर, आता या जोडप्यानं कायदेशीर मार्ग अवलंबला असून एक गंभीर इशारा दिला आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकरनं (Actress Amruta Khanvilkar) कोणत्याही तथ्यांशिवाय सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर मौन सोडलं असून कठोर पावलं उचलली आहेत. अभिनेत्रीच्या लीगल टीमनं अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं तिचा पती हिमांशु मल्होत्रासोबत तिच्या ऑफिशिअल इन्स्टा हँडलवरुन एक संयुक्त पोस्ट शेअर केलीय. तिनं इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीबाबत आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बदनामी करणाऱ्या आणि कोणताही आधार नसलेल्या, तथ्यहीन बातम्या पसरवणाऱ्यांविरोधा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आलाय.
अमृता खानविलकरनं पोस्टमध्ये काय म्हटलंय? (Amruta Khanvilkar Social Media Post)
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरनं पोस्टमध्ये म्हटलंय की, "अधिकृत कायदेशीर निवेदन 10 ऑगस्ट 2026 पासून लागू... अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्याबाबत ऑनलाइन व सोशल मीडिया माध्यनांवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असत्य, निराधार, बदनामीकारक किंवा गोपनीयताचा भंग करणारा मजकूर प्रसारित केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे..."
"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून बदनामी, अफवा किंवा खोटी माहिती प्रसारित केल्यास किंवा शेअर केल्यास, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल... कायदेशीर टीम अमृता खानविलकर...", असं अमृतानं पोस्टमध्ये म्हटलंय.
नेमकं काय घडलंय? (Amruta Khanvilkar Divorce Rumors)
गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेत्री (Marathi Actress) अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar) आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा (Himmanshoo Malhotra) यांच्यात फारकत आल्याच्या चर्चांना उधाण आलंय. पण, आता दोघांचं नातं थेट घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याचेही दावे करण्यात आलेले. गेल्या काही महिन्यांपासून सेलिब्रिटी कपल वेगळं राहत असल्याच्याही चर्चा रंगलेल्या. दोघांनी स्पष्टीकरण देत सोशल मीडियावरचे दावे खोटे असल्याचंही सांगितलेलं. पण, तरीही निराधार चर्चा थांबल्या नाहीत. त्यामुळे आता सेलिब्रिटी कपलनं कठोर पावलं उचलली आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
