Amruta Khanvilkar Kathak: मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे, तिने आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. सौदर्य, अभिनय या व्यतिरिक्त अभिनेत्री (Marathi Actress) आपल्या नृत्यासाठीही ओळखली जाते. तिची अदाकारी नृत्यातून दिसून येते. अमृता खानविलकर सोशल मीडियातही सक्रीय असते. दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी अभिनेत्री सोशल मीडियात शेअर करत असते. अलिकडेच अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टची सध्या चर्चा होत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अमृता वर्गात बसून परीक्षा (Kathak Exam) देत असल्याचं दिसत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta mali) भन्नाट कमेंट केली आहे.
अमृता खानविलकरच्या व्हिडीओवर प्राजक्ता माळीची लक्षवेधी कमेंट (Amruta Khanvilkar Appears for Kathak Written Exam)
मिळालेल्या माहितीनुसार, अमृता खानविलकर हिने अलिकडेच कथक या नृत्य प्रकाराच्या संबंधित एक लेखी परीक्षा दिली आहे. तिने परीक्षा देतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अमृता वर्गात बसून लेखी परीक्षा देत असल्याचं दिसत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'स्वतःचा अभिमान वाटणारा आणखी एक दिवस... कथकसाठी माझी लेखी परीक्षा... हा प्रवास पूर्णपणे वैयक्तिक आणि माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे... काही वर्षांपूर्वी मी स्वतःला वचन दिले होते की, केवळ माझ्या आनंदासाठी मी या मार्गावर चालेन... कोणतीही घाई नाही, कोणतीही अट नाही; फक्त एकेक पाऊल पुढे टाकत राहायचे... आणि आज, इतर विद्यार्थ्यांसोबत बाकावर बसून, हातात हॉल तिकीट आणि रोल नंबर घेऊन, खिडकीजवळच्या जागेत बसून, प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिताना... खूपच छान वाटले! या प्रवासात नेहमी माझा हात धरून सोबत राहिल्याबद्दल @prirasha, तुझे खूप खूप आभार!'.
अमृता खानविलकरची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी अमृता खानविलकरच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या सर्व कमेंट्समध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीची कमेंटमध्ये लक्षवेधी ठरली. तिने अमृता खानविलकरच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे. प्राजक्ताने अमृता खानविलकरच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं की, 'ohh MY MY... Welcome to the league, कसा गेला पेपर'? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर अमृतानेही कमेंट करुन उत्तर दिलं. 'मस्त गेला पेपर', असा रिप्लाय दिला. सध्या अमृता खानविलकरचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
