'शंभू रे'... अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज, महाशिवरात्रीचं हृदयस्पर्शी भजन; 24 तासांत किती व्ह्यूज?
T-Series Presents Amruta Fadnavis Devotional Track: अमृता फडणवीस यांचे नवे भक्तिगीत ‘शंभू रे’ प्रदर्शित झाले आहे. हे भजन भगवान शिवांना अर्पण केलेले भावस्पर्शी गीत आहे.

Amruta Fadnavis Releases Soulful Shiva Bhajan: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायक अमृता फडणवीस, या भक्तिगीतातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. टी-सीरिज प्रस्तुत अमृता फडणवीस यांचे 'शंभू रे' हे गाणं यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. 'शंभू रे' असे गाण्याचे बोल असून, हे भगवान शिवजींना अर्पण केलेले एक हृदयस्पर्शी भजन आहे. भक्तीच्या मुळाशी रुजलेले आणि मनापासूनच्या संगीत अभिव्यक्तीने अधिक उंचावलेले हे गीत शिवभक्तीचा कालातीत सार पकडते, आणि शांतता, सामर्थ्य आणि आध्यात्मिक स्थैर्य जागवते.
या गाण्याचे सुंदर शब्दरचना श्रीजन यांनी लिहिलेली असून, संगीत रचना प्रसिद्ध संगीतकार मॉन्टी शर्मा यांनी केलीये. या भजन गीताचे दिग्दर्शन राजीव वालिया यांनी केले आहे. राजीव वालिया यांनी अत्यंत शांत, दिव्य असा संगीत व्हिडिओ सादर केला आहे. ज्यामध्ये अमृता फडणवीस या दिव्यता, कृपा आणि मनापासून भक्तिभावाने हे गीत सादर करताना दिसत आहेत. ज्यामुळे श्रोते आणि प्रेक्षकांसाठी हा अनुभव ऐकण्यासोबतच पाहण्यासही एक संपूर्ण आध्यात्मिक अनुभूती ठरतो. त्याच्या आत्मस्पर्शी धून आणि ध्यानमग्न ऊर्जेसह, हे भजन भक्तांना श्रद्धेत समर्पित होण्यासाठी आणि भगवान शिवाशी अधिक खोल नाते जोडण्यासाठी आमंत्रित करते.
या भजनाविषयी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “शिव माझ्या श्रद्धेचा फक्त एक भाग नाही. तरस, ते एक भावना आहेत. ‘शंभू रे’ हे माझं त्यांच्याप्रती असलेलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचं माध्यम आहे. प्रत्येक वेळी मी महादेवासाठी गाते, तेव्हा मला असं वाटतं की मी थेट त्यांच्याशी बोलतेय. व्हिडिओचं शूटिंग करतानाही मला असं वाटलंच नाही की मी परफॉर्म करतेय, तो खरोखर भक्ती आणि समर्पणाचा क्षण वाटत होता. मला आशा आहे की हे भजन आणि त्याचे दृश्य, जे ऐकतील आणि पाहतील त्यांच्या सर्वांना तसंच शांततेचं अनुभूती देतील, जशी शिवाची उपस्थिती मला शांतता देते.”
या रिलीजसह, अमृता भारतीय भक्तिसंगीत परंपरेत खोलवर रुजलेला संगीतप्रवास पुढे नेत आहेत, आणि आजच्या त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. जे ध्वनीतून दिलासा, सामर्थ्य आणि दिव्यता शोधतात. “शंभू रे” आता सर्व प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, आणि त्याचा अधिकृत संगीत व्हिडिओ टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर एक्सक्लुझिव्ह स्वरूपात पाहता येईल. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे.

























