'माझा प्रिय मित्र...', डॉन सिनेमाचे दिग्दर्शक चंद्र बरोट यांच्या निधनाने अमिताभ बच्चन हळहळले
Amitabh Bachchan on Chandra Barot death : महानायक अमिताभ बच्चन यांनी 'डॉन' चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे दिवंगत दिग्दर्शक चंद्रा बारोट यांना श्रद्धांजली वाहिली.

Amitabh Bachchan on Chandra Barot death : महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘डॉन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बरोट यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. चंद्रा बरोत यांचे रविवारी मुंबईत वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. अमिताभ बच्चन म्हणाले की, दिग्दर्शक चंद्रा बरोट यांच्या निधनामुळे माझं वैयक्तिकरित्या मोठं नुकसान झालंय. ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान चंद्रा बरोट आणि अमिताभ बच्चन यांच्यात मैत्रीची सुरुवात झाली होती.
चंद्रा बरोट यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन हळहळले
चंद्रा बरोट यांचे रविवारी बांद्रा येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पत्नी दीपा बरोत यांनी द टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, “गेल्या सात वर्षांपासून ते पल्मोनरी फायब्रोसिस या फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत होते.” दिग्दर्शक चंद्रा बरोत यांच्यावर डॉक्टर मनीष शेट्टी यांच्या देखरेखीखाली गुरु नानक रुग्णालयात उपचार सुरू होते. याआधी त्यांना जसलोक रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगद्वारे दिवंगत दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहिली आणि लिहिले की, “ते माझ्यासाठी फक्त दिग्दर्शक नव्हते, तर कौटुंबिक मित्र होते. आणखी एक दु:खद क्षण. ‘डॉन’चे दिग्दर्शक, माझे प्रिय मित्र चंद्रा बरोट आज सकाळी काळाच्या पडद्याआड गेले… हे नुकसान शब्दांत सांगणं कठीण आहे… आम्ही एकत्र काम केलं खरं, पण आमचं नातं केवळ व्यावसायिक नव्हतं… आम्ही एका कुटुंबासारखे राहिलो होतो… मी केवळ प्रार्थना करू शकतो. 🙏”
चंद्रा बरोत हे मनोज कुमार यांचे अनेक वर्ष सहायक दिग्दर्शक होते. ‘रोटी कपडा और मकान’च्या सेटवरच त्यांची ओळख अमिताभ आणि झीनत अमानशी झाली. त्यानंतर ‘डॉन’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं आणि त्या आठवणी अमिताभ बच्चन यांनी आजही जपून ठेवल्या आहेत.
‘डॉन’ विषयी अधिक माहिती:
‘डॉन’ हा चित्रपट 12 मे 1978 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी डबल रोल साकारला होता — एक माफिया डॉन आणि दुसरा त्याचा हुबेहूब गावकरी डुप्लिकेट. या चित्रपटाला प्रचंड यश मिळालं होतं. त्यातील झणझणीत गाणी, संस्मरणीय डायलॉग्स आणि थरारक अॅक्शन सीनमुळे ‘डॉन’ हा एक कल्ट क्लासिक ठरला.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
सौंदर्य असं की वयाच्या 17 वर्षी स्टार झाली, नॅशनल अवार्ड जिंकला, पण एका आरोपाने करियर संपवलं





















