Amitabh Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यातच आता अभिनेत्री निम्रत कौरसोबतच्या अभिषेकचं अफेअर असल्याच्याही चर्चा आहेत. त्यातच आता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या पत्रामध्ये अमिताभ यांनी निम्रतचं भरभरुन कौतुक केल्याचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.
अमिताभ बच्चन यांना अशी सवय आहे की जेव्हा त्यांना एखाद्या कलाकाराचे काम आवडते तेव्हा ते त्यांना स्वत:च्या हाताने लिहून एक पत्र पाठवतात. विकी कौशल आणि राधिका मदन यांचंही असंच कौतुक केलं होतं.तसंच पत्र त्यांनी निम्रतलाही दिलं होतं.
अमिताभ यांचं पत्र व्हायरल
अमिताभ बच्चन यांनी निम्रतला हे पत्र 8 एप्रिल 2022 मध्ये लिहिलं होतं. या पत्रात अमिताभ बच्चन यांनी म्हटलं होतं की, आपण क्वचितच भेटलो आहोत. यशराज फिल्म्सच्या एका कार्यक्रमात आपली भेट झाली होती. तसेच या पत्रात अमिताभ यांनी निम्रतच्या एका जाहिरातीचं कौतुक केलं होतं. तसेच दसवी या सिनेमातील तिच्या कामाचंही अमिताभ यांनी कौतुक केलं.
निम्रत कौरने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर अमिताभ बच्चन यांचे पत्र शेअर केले होते. त्यावर कॅप्शन देत तिने म्हटलं की, 18 वर्षांपूर्वी जेव्हा ती मुंबईत आली होती तेव्हा तिचे स्वप्न होते की अमिताभ बच्चन तिच्या कामाचे कौतुक करतील. तिच्या नावाने तिला ओळखतील आणि आता हे स्वप्न पूर्ण झालं आहे.
यंदा वाढदिवसाला ऐश्वर्याला बच्चन कुटुंबाकडून कोणत्याही शुभेच्छा नाहीत?
यंदाच्या वर्षात मात्र ऐश्वर्याला बच्चन कुटुंबाकडून कोणत्याही शुभेच्छा मिळाल्या नसल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसलं. त्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण अद्यापही ऐश्वर्या आणि अभिषेकडून यावर अधिकृत असं भाष्य करण्यात आलेलं नाहीये.