Amitabh Bachchan : मराठी रंगभूमीवरील चिरतरूण अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक प्रशांत दामलेंसाठी (Prashant Damle) 'बिग बी' अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मी त्यांच्या कामाचा चाहता अशा शब्दांत प्रशांत दामले यांचे कौतुक केलं आहे. नुकतेच प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या कारकिर्दीचे 12 हजार पाचशे प्रयोग पूर्ण झाले. या निमित्ताने त्यांच्या कार्याचं संपूर्ण देशभरात कौतुक केलं जात आहे. राजकीय मंडळींपासून सिने कलाकारांपर्यंत सगळेच त्यांच्या या प्रवासाबद्दल अभिनंदन करताना दिसतात. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून प्रशांत दामले यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 






बिग बी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "प्रशांत दामले यांचा 12,500 प्रयोगांचा विक्रम आज होतो आहे. 39 वर्षांत एवढे प्रयोग करणं ही कौतुकाची गोष्ट आहे! मी 'एका लग्नाची गोष्ट' या 1000 व्या प्रयोगाला गेलो होतो. आज मी उपस्थित नसलो तरी मनाने मी तिथेच तुमच्याबरोबरच आहे! माझ्याकडून प्रशांतजींना हार्दिक शुभेच्छा!" अशा शब्दांत अमिताभ बच्चन यांनी प्रशांत दामले यांचं कौतुक केलं आहे. 






12,500 प्रयोगाचा टप्पा पार 


मराठी रंगभूमी गाजविणारे नट म्हणजेच प्रशांत दामले. गेली तीन दशके मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ म्हणून प्रशांत दामले ओळखले जातात. त्यांच्या या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी अनेक विक्रम केले. आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात प्रशांत दामले यांच्या नाटकाचा 12,500 वा प्रयोग पार पडला. हा प्रयोग यशस्वी होताच त्यांचं देशभरात लोकांकडून भरभरून कौतुक होत आहे.      


महत्वाच्या बातम्या : 


Eknath Shinde : आम्ही तीन महिन्यांपूर्वी महानाट्य केलं, त्याचे पडसाद आजही उमटताहेत, आम्ही जगभरात फेमस झालो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे