Amitabh Bachchan New Property: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या लग्झरी लाईफस्टाईलसाठी (Luxury Lifestyle) ओळखले जातात. त्यांच्या मालमत्तांबाबत बोलायचं झालं तर, मुंबईतच त्यांचे अनेक बंगले आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी अयोध्येतही मालमत्ता खरेदी केली. त्यावेळी त्याबाबत बऱ्आच चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत मालमत्ता खरेदी (Amitabh Bachchan Buys Property in Ayodhya) केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत राम की नगरी इथे चौथी मालमत्ता खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी सुमारे 25,000 हजार चौरस फुटांचा एक मोठा भूखंड खरेदी केला असून त्याची किंमत तब्बल 40 कोटी असल्याची माहिती मिळत आहे.
बिग बींनी अयोध्येत 25,000 चौरस फूट भूखंड खरेदी केल्याचं वृत्त
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अमिताभ यांनी अयोध्येत 25,000 चौरस फूट भूखंड खरेदी केल्याचे वृत्त आहे. त्याची किंमत 40 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. ही जमीन 'सरयू' नावाच्या रिअल इस्टेट डेव्हलपमेंटजवळ आहे. अमिताभ यांनी यापूर्वीही अयोध्येत गुंतवणूक केली होती. अमिताभ यांनी बॉलिवूड निर्माते आनंद पंडित यांच्या रिअल इस्टेट फर्ममध्ये 10 कोटी रुपये गुंतवल्याचं वृत्तही काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.
अयोध्येतील गुंतवणुकीबाबत अद्याप अभिनेत्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
अयोध्येतील अमिताभ यांच्या गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर, अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत खरेदी केलेली ही चौथी मालमत्ता आहे. यापूर्वी, राम मंदिरातील रामलालाच्या प्राण प्रतिष्ठेपूर्वी त्यांनी 5,372 चौरस फूटचा भूखंड खरेदी केला होता, ज्याची किंमत 4.54 कोटी असल्याचं सांगितलं जात होतं. याशिवाय, त्यांनी सरयू प्रकल्पात 14.5 कोटींची गुंतवणूक केली होती आणि 54,000 चौरस फूटचा भूखंड खरेदी केला होता. दरम्यान, मिडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक बांधण्याची योजना आखत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
अमिताभ बच्चन यांनी लेकासोबत केली गुंतवणूक
सध्या एकंदरीतच सारे बच्चन कुटुंबीय रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत आहेत. काही काळापूर्वी त्यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत 10 अपार्टमेंट खरेदी केले होते. ज्याची किंमत 25 कोटी असल्याचं सांगितलं जात होतं.
अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, ते शेवटचे ' Vettaiyan'मध्ये दिसले होते. याशिवाय ते 'कल्की 2898 AD'मध्ये दिसले होते. आता ते 'रामायण: 1'मध्ये दिसणार आहेत. यामध्ये ते जटायूची भूमिका साकारणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :